उमरखेड/ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांची उमरखेड विभागात तीन जिल्हे तडीपारची मोठी कारवाई
प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ
उमरखेड दिनांक 10/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पाहीजे आरोपी शोध, अउघड गुन्हे समांतर तपास करीत असतांना 12/00 वाजण्याचे सुमारांस 1) मा. उपविभागीय अधिकारी सा उमरखेड यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक तडीपार प्र.क्र./03/मपोका कलम 56 (अ), (ब) विडूळ ता. उमरखेड दिनांक 02/04/2025 अन्वये 01 वर्षा करीता यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम जिल्हा तडीपार असलेला इसम नामे-रितेश महेंद्र तिवारी रा.विडूळ ता.उमरखेड जि. यवतमाळ हा विडूळ परिसरात राहत असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद आदेशांची पडताळणी करुन तडीपार इसमांबाबत माहीती काढून त्यास विडूळ ते ढाणकी रोड विरु धाबा हरदडा परिसर येथून ताब्यात घेवून त्यास मा. उपविभागीय अधिकारी सा उमरखेड यांनी पारित केलेल्या आदेशांचे उल्लघंन केले. दिनांक 02/10/2026 22/30 वाजण्याचे सुमारांस 1) मा. उपविभागीय अधिकारी सा उमरखेड यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक तडीपार प्र.क्र./05/मपोका कलम 56 (अ), (ब) मौजा नागापूर रुपाळा ता. उमरखेड दिनांक 02/04/2025 अन्वये 01 वर्षा करीता यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम जिल्हा तडीपार असलेला इसम नामे- शेख गौस शेख करीम वय 22 वर्ष, रा. नागापूर रुपाळा ता.उमरखेड जि. यवतमाळ हा उमरखेड ते ढाणकी रोड हायवे ब्रिज परिसरात असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद आदेशांची पडताळणी केली करुन तडीपार इसमांबाबत माहीती काढून त्यास उमरखेड ते ढाणकी रोड हायवे ब्रिज परिसर येथून ताब्यात घेवून त्यास मा. उपविभागीय अधिकारी सा उमरखेड यांनी पारित केलेल्या आदेशांचे उल्लघंन केले असल्याने दोन्ही तडीपार इसम नामे 1) इसम नामे-रितेश महेंद्र तिवारी वय 24 वर्ष, रा.विडूळ ता.उमरखेड जि. यवतमाळ 2) इसम नामे- शेख गौस शेख करीम वय 22 वर्ष, रा. नागापूर रुपाळा ता.उमरखेड जि. यवतमाळ यांचे 223 भान्यास सह कलम 142 मपोका अन्वये उमरखेड पोलीस स्टेशन गुना दाखल करुन पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन उमरखेड यांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से)सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड, यांच्या मार्गदर्शनात धिरज बांडे, शरद लोहकरे,मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनिल पंडागळे, रविंद्र शिरामे.राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
