खाजगी बसमधून नशिल्या पदार्थांची तस्करी; नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपयांचे मेफेड्रोन जप्त

खाजगी बसमधून नशिल्या पदार्थांची तस्करी; नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपयांचे मेफेड्रोन जप्त

 

 

कळमेश्वर: मुंबईवरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या एका खाजगी बसमधून होणारी अंमली पदार्थांची तस्करी नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरित्या उघडकीस आणली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काळबांडे व त्यांच्या पथकाने गोंडखैरी नाक्यावर सापळा रचून ही धडक कारवाई केली. बसच्या एका सीटखाली लपवून ठेवलेले ७९.८५ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हस्तगत करण्यात आले असून एकूण ४ लाख ८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ही मेफेड्रोन पावडर बसमध्ये ठेवणारा आरोपी सराईत गुन्हेगार अंशुल गजभिये असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कळमेश्वर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८ (क) आणि २२ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पथक फरार आरोपीचा कसून शोध घेत आहे.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *