मातोश्री माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी N M M S परीक्षेत उत्तीर्ण
दि.२६-२-२०२६महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षण विभाग द्वारा आयोजित राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा दरवर्षी घेतली जाते त्यामध्ये वर्ग आठवा मधून विद्यार्थी शोधून त्यांच्या शिक्षणाची पूर्णपणे हमी शासनामार्फत घेतली जाते सदर परीक्षेत मातोश्री विद्यालय आपल्या यशाचा ठप्पा पाडण्यास सरस पुढे आहे त्यामध्ये सिद्धी देशमुख, श्रीतेज राठोड, प्रणव राठोड ,केतकी केदार, सृष्टी चौरे ,जनार्दन येनकर, अजिंक्य आडे, श्रुती जाधव या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले व प्रज्ञावंत म्हणून आपलं स्थान निश्चित केलं. उत्तीर्ण विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थापक दिगंबर जगताप यांनी शुभेच्छा देऊन पुढील कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या व प्राचार्य व समस्त मातोश्री शाळेचे कर्मचारी वृंद व पालक वर्ग यांनी पुढील शैक्षणिक पुढील कार्यासाठी व वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Ct india News जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ
