रमजान ईद निमित्त पत्रकार बांधवांकडून एस के शब्बीर यांचा ईद निमित्त शुभेच्छांचा वर्षाव.
महागाव रमजान ईदच्या पवित्र आणि आनंददायी निमित्ताने परिसरातील अनेक संघटनेच्या पत्रकार बांधवांनी एकत्र येत ज्येष्ठ पत्रकार एस के शब्बीर यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. बंधुभाव, एकोपा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले.यावेळी उपस्थित पत्रकार महासंघाचे पदाधिकारी भेट देऊन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी महागांव पत्रकार महासंघाचे मार्गदर्शक. श्री.गजानन वाघमारे साहेब. संघटनेचे अध्यक्ष श्री गणेश भोयर. निलेश पाटील नरवाडे. नानाभाऊ ठाकरे. पवन रावते. अमोल राजवाडे. धम्मानंद कावळे. नंदकुमार कावळे. अरबाज खान कयूम खान पठाण. अकील शेख. प्रवीण कावळे.या सर्व पत्रकारांनी एस के शब्बीर यांच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनेक समाजातील विविध प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवणारे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या समस्या मांडणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे. एस के शब्बीर यांनीही सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानत रमजान ईद हा सण शांतता, प्रेम आणि सौहार्द वाढवणारा असल्याचे सांगितले. समाजात बंधुभाव टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
सर्वांनी रमजानईदच्या पत्रकार यांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला. या प्रसंगी पत्रकार बांधवांमध्ये एकात्मता आणि मैत्रीचा सुंदर संदेश दिला गेला.
