अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘फकिरा’ कादंबरी शिल्पाचे भूमिपूजन 

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘फकिरा’ कादंबरी शिल्पाचे भूमिपूजन

पुणे | १ ऑगस्ट २०२६ : लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त सारसबाग येथील लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात त्यांच्या गाजलेल्या ‘फकिरा’ या अजरामर कादंबरीच्या शिल्पाच्या उभारणीसाठी भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.

 

या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी, कामगार प्रतिनिधी तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर प्रेम करणारे असंख्य नागरिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिल्पाच्या उभारणीच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला.

 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला दिलेल्या प्रेरणेचा गौरव केला. ‘फकिरा’ ही कादंबरी अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असून, तिचे शिल्प उभारल्यामुळे भावी पिढ्यांना अण्णाभाऊंच्या विचारांचा आणि साहित्याचा परिचय अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

या उपक्रमामुळे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याला कायमस्वरूपी अभिवादन करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

माजी गृहराज्य मंत्री रमेश दादा बागवे, माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे, यांनी भावना व्यक्त केल्या आणि आयोजन मातंग समाज पुणे शहर जिल्हा माजी सचिव दीपक भाऊ कसबे यांनी आयोजन केले होते.

 

प्रतिनिधी – संदिप पांचाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *