तुमसरात पोलिसांची दबंग कारवाई: प्रभाव लॉजवरील हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेट उद्ध्वस्त!

तुमसरात पोलिसांची दबंग कारवाई: प्रभाव लॉजवरील हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेट उद्ध्वस्त!📌 एका महिलेसह ५ पुरुष आरोपी गजाआड; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची मोठी कामगिरी;

 

तुमसर:भंडारा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि तुमसर पोलिसांनी आज एका धाडसी कारवाईत तुमसर शहरातील ‘प्रभाव लॉज’वर चालणाऱ्या अवैध देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात पोलिसांच्या पथकाने एका महिला आरोपीसह पाच पुरुष आरोपींना रंगेहात अटक केली. तसेच या दलदलीत अडकलेल्या पीडित महिलांची सुटका करत पोलिसांची दबंग कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

🚨 गुप्त माहितीवरून सापळा: आज ३ ऑगस्ट २०२६ रोजी तुमसर शहरातील प्रभाव लॉजवर अवैध देहव्यापार आणि मानवी तस्करी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.तुमसर पोलिसांची धाडसी रेड तात्काळ: माहिती मिळताच तुमसर पोलीस स्टेशन आणि अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी तातडीने लॉजवर छापा टाकला.आरोपीचे मुसक्या आवळल्या: घटनास्थळावरून मुख्य महिला आरोपी आणि इतर ५ पुरुष आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पथकाने पीडित महिलांची सुटका केली. त्यांची वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

⚖️ गुन्हा दाखल:या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८९०/२०२६ अंतर्गत, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ च्या कलम ३, ४, ५ नुसार सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.

👑 भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली. या दबंग कारवाईत सुभाष बारसे (पोलीस निरीक्षक, तुमसर पोलीस ठाणे)रविंद्र लांडे (सहायक पोलीस निरीक्षक)रविंद्र रेवतकरअर्चना कुथे (महिला पोलीस हवादार)मंजुषा घरडेमानिक किरसान (अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, भंडारा)नेमुताई गाढवे (म.पो.हवा.)पो.अं. चौधरी, गिरीपुंजे (तुमसर पोलीस ठाणे)शहरातील अशा अवैध धंद्यांचे कंबरडे मोडणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या या धडक आणि दबंग कामगिरीचे नागरिकांकडून जोरदार कौतुक होत आहे.

 

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *