गौताळा अभयारण्य चाळीसगाव वनपरिक्षेत्रात (वन्यजीव) अवैध जिवंत झाडांची कापून/तोड करणाऱ्या तस्करीवर संयुक्त कारवाई.
गोपनीय माहितीच्या आधारे पाच दिवसांच्या तपासानंतर तीन आरोपी ताब्यात; सागवान वृक्षाच्या ४ व अंजन वृक्षाच्या ५७ अशा एकूण ६१ बल्ल्या जप्त !
दिनांक : १४ सप्टेंबर २०२६
Crime & Corruption Control Association ला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गौताळा अभयारण्य चाळीसगाव वनपरिक्षेत्रात (वन्यजीव) सुरू असलेल्या अवैध जिवंत झाडांची कापून/तोड करणाऱ्या तस्करीबाबत माहिती प्राप्त झाली.
माहितीची गंभीरता लक्षात घेऊन Crime & Corruption Control Association च्या पथकाने संबंधित वरिष्ठ वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर CCCA पथकाने सलग पाच दिवस गोपनीय पद्धतीने माहितीची पडताळणी, हालचालींचे निरीक्षण व आवश्यक तपास केला.
माहितीची खातरजमा झाल्यानंतर संबंधित वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या समन्वयाने Crime & Corruption Control Association आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मुद्देमालासह सागवान वृक्षाच्या ४ बल्ल्या आणि अंजन वृक्षाच्या ५७ बल्ल्या याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर MH 19 CV 4603 व ट्रॉली MH 19 E 2685 सह अशा एकूण ६१ बल्ल्या व वाहन जप्त करण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी
१) गोकुळ आनंदा गोपाळ, वय ४० वर्षे, रा. बोढरा
२) अरविंद विजय जाधव, वय २० वर्षे, रा. बोढरा
३) निलेश एकनाथ राठोड, वय २५ वर्षे, रा. बोढरा
या प्रकरणात न्यायालयासमोर आरोपींना हजर करण्यात आले असून न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी मंजूर केली आहे.
गुन्ह्याचे स्वरूप व लागू कलमे
या प्रकरणामध्ये भारतीय वन अधिनियम,१९२७ चे कलम २६(१)(फ)(ड), ४१ व ४२ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य अधिक आहे, कारण कारवाईशी संबंधित जिवंत झाडांची तोड गौताळा अभयारण्य चाळीसगाव वनपरिक्षेत्रातिलाच (वन्यजीव) असल्याचे समोर आले आहे.
अभयारण्यातील जिवंत झाडे कापून /तोडून होणारी तस्करी अधिक गंभीर आहे.
गौताळा अभयारण्य हे अधिसूचित वन्यजीव अभयारण्य आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील कलम २९ नुसार अभयारण्यातून परवानगीशिवाय वन्यजीव किंवा वनउत्पादन नष्ट करणे, काढणे , वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट करणे , वन गुन्हा करण्याच्या हेतूने अपप्रवेश त्याचे शोषण करणे प्रतिबंधित आहे.
त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ ६१ बल्ल्यांची जप्ती आणि तीन आरोपींची अटक म्हणून पाहता कामा नये. अभयारण्याच्या क्षेत्रातून वनसंपदेची तस्करी झाली असल्याने त्यामागील संपूर्ण साखळी शोधणे अत्यंत आवश्यक आहे.
जिवंत झाडे कापून/तोडून नेमके अभयरण्याच्या कोणत्या बिटातून तोडण्यात आले, तोडणी कोणी केली, वाहतूक कोणी केली, त्यासाठी कोणते मार्ग वापरण्यात आले, या संपूर्ण तस्करीच्या मागे आणखी कोण व्यक्ती किंवा टोळी कार्यरत आहे, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
तपास केवळ पकडलेल्या आरोपींपुरता मर्यादित राहू नये
Crime & Corruption Control Association ची स्पष्ट मागणी आहे की या प्रकरणातील तपास केवळ प्रत्यक्ष पकडलेल्या तीन आरोपींपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण तस्करीच्या नेटवर्कपर्यंत नेण्यात यावा.
तपासादरम्यान कोणत्याही व्यक्तीचा, खाजगी व्यक्तीचा अथवा शासकीय यंत्रणेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा अवैध वृक्षतोड, वाहतूक, तस्करी, वन गुन्हाला संरक्षण किंवा मदत यामध्ये सहभाग आढळून आल्यास संबंधिताचीही निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी.
CCCA कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर आरोप करीत नाही. मात्र, अभयारण्यातील वनसंपदेची तस्करी करणाऱ्या संपूर्ण नेटवर्कपर्यंत तपास पोहोचणे ही या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब आहे.
या संपूर्ण प्रकरणाची CCCA ने खात्री लायक गोपनीय सबळ पुराव्यानिशी सखोल तपास केला असता. अभयारण्य क्षेत्रातून जिवंत झाडांची तोड करून. ऊसतोड कामगारांच्या मुकादमाना विक्री केल्याचे समजले आहे.ज्या अभयारण्य मध्ये पट्टेरी वाघ,अस्वल, बिबट, यांचे वास्तव्य असताना त्यांचा अधिवास नष्ट करण्याचे काम या संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना जितके हे पकडलेले गुन्हेगार जबाबदार आहे तितकेच क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी देखील जबाबदार आहे. त्यांच्या सहभागा शिवाय हे आरोपी एवढे धाडस करू शकत नाही.याला आणखी कायदेशीर पुष्टी देण्यासाठी या पकडलेल्या आरोपींच्या मोबाईलचा मागील 6 महिन्याचा जरी CDR, whatsapp Call/Chat काढला तरी अनेक वन गुन्हे समोर येतील व सर्व आरोपींचा मोबाईल CDR, whatsapp Call/Chat काढावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे.
तसेच या आधी पकडलेले सगळेच आरोपी यांना सहसा 2 ते 3 दिवसाचीच वन कोठडी मिळते. याचे मुख्य कारण संबंधित अधिकारी न्यायालयात हेतुपुरस्सर गुन्ह्यातील आरोपींचे अत्यावश्यक व कायद्याच्या चौकटीत बसणारे कागद पत्रे तयार करीत नाहीत.त्यामुळेच ह्या सर्व त्रुटींचा फायदा घेत 2 ते 3 दिवसाची वन कोठडी व तत्काळ जमीन होऊन जातो.या प्रकरणात देखील असेच घडण्याची शक्यता आहे तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याच्या संबंधी सर्व कागद पत्रांची काळजीपूर्वक पडताळणी करून मगच न्यायालयात सादर करावे.
Crime & Corruption Control Association कडे प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या स्रोताची ओळख सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक करण्यात येणार नाही.
CCCA प्रकरणातील पुढील तपासावर लक्ष ठेवून राहणार असून गौताळा अभयारण्य जिवंत वृक्ष तोड करणाऱ्या तस्करीच्या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश होऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी संबंधित सक्षम यंत्रणांशी आवश्यक समन्वय साधत राहील.
— Crime & Corruption Control Association
महाराष्ट्र राज्य
