*सोयगाव पंचायत समितीत पुन्हा चर्चेला उधाण! देव्हारीच्या रोजगार सेवकाच्या कामांची चौकशी होणार का*?
*उपशीर्षक* : विहिरी व गाय गोठ्यांच्या कामांची सखोल चौकशी करण्याची माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक अवचार यांची मागणी!
तालुका सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
देव्हारी (ता. सोयगाव) : देव्हारी गावात सन २०२४ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मंजूर झालेल्या विहिरी व गाय गोठ्यांच्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक भास्कर अवचार यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सोयगाव यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
संबंधित रोजगार सेवक आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून कामांची प्रत्यक्ष स्थळ तपासणी करण्यात यावी. तसेच मंजुरी आदेश, मस्टर रोल, मोजमाप पुस्तिका, बिल-व्हाउचर, जिओटॅग फोटो आणि प्रत्यक्ष खर्चाची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कागदोपत्री पूर्ण दाखविलेली कामे प्रत्यक्षात पूर्ण आहेत का, याची तपासणी करून अनियमितता आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही तक्रारदाराने केली आहे.
आता या तक्रारीची पंचायत समिती प्रशासन दखल घेणार का आणि देव्हारीतील कामांची चौकशी होणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
टीप : ही बातमी तक्रारदाराने केलेल्या मागणीवर आधारित असून, आरोपांची अधिकृत चौकशी होणे बाकी आहे.
सोयगाव पंचायत समितीत पुन्हा चर्चेला उधाण! देव्हारीच्या रोजगार सेवकाच्या कामांची चौकशी होणार का*?
