*नागपूर रोडवरील फेटरी येथे भीषण अपघात; ब्रिजवरून दुचाकी खाली कोसळली रिपोटर;जयश्री चव्हाण*
दिव्यांशी फाउंडेशन व पोलीस प्रशासनाच्या मदतीने गंभीर जखमीला नागपूर मेडिकल येथे हलविले
*फेटरी, कळमेश्वर | दिनांक १७ ऑऑक्टोबर२०२६*
नागपूर रोडवरील हनुमान मंदिराजवळ, फेटरी येथे दिनांक १७ ऑक्टोबर रोजी भीषण अपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीस्वाराची गाडी पुलावरून खाली कोसळली. या अपघातात दिलीप बावणे (वय अंदाजे ४८ वर्षे, रा. कोहळी-मोहळी, ता. कळमेश्वर) हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच *दिव्यांशी फाउंडेशनचे सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे,* अनुग्रह तिडके आणि प्रतीक बागडे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. यावेळी पोलीस प्रशासनातील पीएसआय सुनील मिश्रा, पोलीस कर्मचारी दुर्गेश डहाके आणि गिरीश मोहोड यांनीही मदतकार्य केले.
जखमी दिलीप बावणे यांची प्रकृती गंभीर असल्याचे दिसून आल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले.
*अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक : MH 40 X 2668*
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याबाबत अधिक माहिती मिळणे अपेक्षित आहे.
*संकटकाळी मदतीसाठी धावणारे हात… दिव्यांशी फाउंडेशन!*
सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे आणि सहकाऱ्यांच्या तत्परतेने जखमीला वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यास मदत झाली. मगेश भाऊ तूमचा या कार्यला सलाम🙏💐
