*सोयगाव तालुक्यात प्रथमच होणार दिव्यांग बांधवांची तपासणी आणि मिळणार जागेवरच प्रमाणपत्र*
सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोयगावात भव्य महाआरोग्य शिबिर;
इद्रिस मुलतानी यांच्या पुढाकाराने दिव्यांगांसाठी जागेवर तपासणी व प्रमाणपत्र वाटप.!!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय, सोयगाव येथे सकाळी १० वाजेपासून भव्य महाआरोग्य शिबिर तसेच दिव्यांग तपासणी व नवीन तसेच नूतनीकरण प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी सोयगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असा हा आगळावेगळा उपक्रम भाजपाचे अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांच्या प्रयत्नाने दिव्यांग बांधवांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, त्याकरिता दिव्यांग बांधवांमध्ये चांगला उत्साहाचा वातावरण निर्माण झालेला आहे त्यामध्ये दिव्यांग बांधवांना जर कुठलाही आजार असेल तर त्यावर सुद्धा निदान होणार आहे तसेच त्यांना आयुष्मान भारत कार्ड सुद्धा वितरण करण्यात येणार आहे.
हा उपक्रम भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा सोयगाव तालुक्याचे लोकप्रिय नेते इद्रीसजी मुलतानी यांच्या विशेष पुढाकारातून हा लोकहिताचा उपक्रम राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील गोरगरीब, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा सोयगाव तालुक्यातच उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न मुलतानी यांचा आहे.
इद्रीसजी मुलतानी यांनी नुकतीच आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांची भेट घेऊन यांच्या विशेष पुढाकाराने सोयगाव तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्रासाठी छत्रपती संभाजीनगर येथे वारंवार 150 की मी जावे लागत असल्याने खूप अडचणी निदर्शनास आणून दिल्या होत्या. या मागणीची बोर्डीकर ताई यांनी सकारात्मक दखल घेत नागरिकांना त्यांच्या तालुक्यातच सुविधा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात उपलब्ध सुविधा
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी.
दिव्यांग नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना जागेवरच नवीन व नूतनीकरण दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण.
शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व नोंदणी सुविधा.
श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना आदी योजनांची माहिती.
या शिबिरामुळे दिव्यांग नागरिकांना पेन्शन, शिक्षण, रोजगार, घरकुल, बँक कर्ज तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असून, जिल्हा रुग्णालयापर्यंतचा वेळ, खर्च व धावपळही वाचणार आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण तसेच राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या तालुक्यातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
शिबिराची माहिती
दिनांक : शुक्रवार, २४ जुलै २०२६
वेळ : सकाळी १०.०० वाजेपासून
स्थळ : उपजिल्हा रुग्णालय, सोयगाव
भाजपा सोयगाव मंडळ अध्यक्ष संजय पाटील व भाजपा शहर अध्यक्ष मंगेश सोहनी यांनी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, महिला व गरजू रुग्णांनी व सर्व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण महाआरोग्य शिबिरात सहभागी होऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा,असे जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई काळे,माहीम मुलतानी, पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण,राहुल राठोड, जयश्री पवार, नगरसेविका सविता जावळे,तसेच भाजपाचे पदाधिकारी शिवाजी बुडाळ,बद्री राठोड,गणेश लोखंडे,जयप्रकाश चव्हाण, सुनील गवांडे,संजीवन सोनवणे,वसंत बनकर, कैलास काळे,राजेंद्र जावळे यांच्या कडून आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे…
