27 वर्षांनंतर भारतीय जनसेवा मंडळाची नव्या कार्यकारिणीची घोषणा .भारतीय जनसेवा मंडळ, रामटेकच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा सोमवारी दिनांक 27 जुलै रोजी खिंडशी रोडवरील हॉटेल शिकारा येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. तब्बल 27 वर्षांनंतर मंडळाच्या कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आल्याने सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन कार्यकारिणीत सयोजक ध्यानिदास महाराज, चंद्रपाल चौकसे यांची अध्यक्षपदी, डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांची महासचिवपदी, चंद्रकांत ठक्कर यांची उपाध्यक्षपदी, कोषाध्यक्ष ऋषी किमतकर, सहसचिव सुभाष बघेले, कायदा सल्लागार शेखर बघेले, कायदा सहप्रमुख धनराज काठोके, यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून सुरेश सोनकुसरे, विनायक डांगरे, नत्थु घरजाळे, हुकुमचंद बडवाईक, मोहन कोठेकर आणि राहुल कोठेकर यांची निवड करण्यात आली.
भारतीय जनसेवा मंडळाची स्थापना संत गोपाल बाबा यांनी सन 1999 मध्ये सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने विविध जनहिताचे कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले. मात्र, संत गोपाल बाबा यांच्या निधनानंतर तसेच मंडळातील काही ज्येष्ठ सदस्यांच्या निधनामुळे संस्थेच्या कार्यात काही काळ खंड पडला होता.
आता नव्या कार्यकारिणीच्या गठनामुळे मंडळाच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार असून सामाजिक ऐक्य, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक उपक्रम अधिक व्यापकपणे राबविण्याचा संकल्प नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. रामटेक परिसरातील जनतेच्या सहकार्याने मंडळाची वाटचाल अधिक प्रभावी करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
सिटी इंडिया न्यूज करीता रामटेक तालुका व्रतिनिधी हर्षपाल मेश्राम
