प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे—- सरपंच पंकज साबळे कामठी
प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी एका रोपाचे वृक्षारोपण करून त्याचे झाडात संवर्धन करण्यासाठी पुढाकार करण्याचे आव्हान रनाळा ग्रामपंचायतचे सरपंच पंकज नागोराव साबळे यांनी रनाळा ग्रामपंचायत च्या वतीने समाज भवन जुना रनाला येथे रनाला ग्रामपंचायत च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या पर्वावर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात सरपंच पंकज नागोराव साबळे यांचे हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी अमोल वाघ, ग्रामपंचायत सदस्य मयूर गणेर, सुनील चलपे उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते समाज भवन व पोळा क्रीडांगणनावर २५ रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी अमोल वाघ यांनी केले. वृक्षारोपण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कामठी तालुका प्रतिनिधी – दिलीप मेश्राम
