मनुष्याने सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य केल्यास यशाचा मार्ग प्राप्त होतो — कमलभाई कामठी
मनुष्याने मन -बुद्धी- संस्कार यांचा मेळ घालून सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य केल्यास यशाचा मार्ग प्राप्त होऊन सर्वांगीण कल्याण होत असल्याचे मत ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान येथील जेष्ठ मार्गदर्शक कमलभाई यांनी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय रनाळा शाखा सुरक्षा विभागाचे वतीने नवीन कामठी पोलीस ठाण्यात आयोजित आत्म सुरक्षा कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रणाळा शाखेच्या संयोजिका राजयोगिनी ब्राह्मकुमारी प्रेमलता दीदी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी माउंट आबू राजस्थान येथून आलेले जेष्ठ मार्गदर्शक हितेशभाई, कमलभाई ,दीपकभाई ,दत्ताभाई ,नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, जुने कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष बनसोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे ,शिलू दीदी ,वंदना दिदी ,घनश्याम चकोले ,नगरसेवक नितेश यादव ,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे, अखिलेश ठाकूर उपस्थित होते कार्यक्रमात माउंट आबू येथून आलेले जेष्ठ मार्गदर्शक कमलभाई, हितेश भाई मार्गदर्शन करताना म्हणाले , मनुष्याने मन -बुद्धी -संस्कार यांचा योग्य मेळ घालून सकारात्मक दृष्टीकोणातून कार्य केल्यास नकारात्मक भावनां सहजरीत्या नष्ट होऊन मनात मोठ्या प्रमाणात मानसिक शक्ती निर्माण होत असल्याने कोणतेही कार्य सहजरीत्या यशस्वी पणे पूर्ण करता येतात त्यामुळे मनुष्याला यशाचा मार्ग प्राप्त होऊन सर्वांगीण कल्याण होत असतो ,सोबतच सदैव परमेश्वराचे नामस्मरण करून गुरूंचा आदर्श ठेवून कार्य करण्याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रेमलता दीदी म्हणाल्या, धावपळीच्या युगात आवश्यक गरजा पूर्ण करण्याकरिता प्रत्येक माणूस मानसिक तणावात वावरात असल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मानसिक शक्तीचा योग्य वापर करून सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य केल्यास यशाचा मार्ग प्राप्त होऊन सर्वांगीण कल्याण होत असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना दिदि यांनी केले संचालन पोलीस उपनिरीक्षक एस पवार यांनी केले व आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक सृष्टी कदम यांनी केले कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव ,मनीश हीवरकर ,यश ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव ,संदीप भिताडे, सुरेश पठाडे, विकास तिडके, अक्षय झगडे ,सागर भंडारी ,आकाश महल्ले , मिलिंद मेश्राम सह पोलीस पाटील ,पत्रकार ,पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामठी तालुका प्रतिनिधी – दिलीप मेश्राम
