महागाव नगर पंचायत सर्वसाधारण सभा गाजली विकासकामांना गती देण्याचा निर्धार

महागाव नगर पंचायत सर्वसाधारण सभा गाजली विकासकामांना गती देण्याचा निर्धार

 

 

 

प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव

 

 

 

महागाव नगर पंचायत गुरुवार ला झालेली सर्वसाधारण सभा विविध विकासात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा होत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. रंजना दीपक आडे तर उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेमध्ये गावाच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण विषय मांडण्यात आले.

पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत डीपीआर क्रमांक एक ते चारमधील वंचित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तातडीने निधी जमा करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. या संदर्भातील विशेष ठराव सभागृहात मांडण्यात आला असून तो सभागृहाने एकमताने मंजूर केला.

यासोबतच येणाऱ्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य भीषण पाणीटंचाई टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महागाव शहरातील पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन दुरुस्ती, विहिरींवरील इलेक्ट्रिकल कनेक्शन तसेच आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती व नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही ठोस निर्णय घेण्यात आले.तसेच महागाव शहरातील एक ते सतरा वॉर्डांमध्ये विविध विकासकामे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने रस्ते बांधकाम, बंदिस्त नाल्या, सभागृह उभारणी तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विविध विकासकामांचा समावेश आहे. ही कामे लवकरात लवकर प्रशासकीय मंजुरी मिळवून प्रत्यक्षात आणण्याबाबत सभागृहात सकारात्मक चर्चा झाली.महागाव शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सर्वसाधारण सभा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. येत्या काळात महागाव शहराचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कटिबद्धतेची भूमिका घेत ठोस निर्णय घेतले.महागाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेला निधी आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा आणि आमदार किसनराव वानखेडे यांच्या माध्यमातून विविध विकास योजनांचा निधी महागाव नगरपंचायतीसाठी खेचून आणण्याचा ठाम निर्धार असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष सौ. रंजना दीपक आडे यांनी दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.महागाव शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आणि शहराचा नियोजनबद्ध विकास घडवून आणणे हा नगरपंचायतीचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ महागाव शहराला मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.महागाव शहराच्या प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या सहकार्याने विकासकामांना गती देत शहराचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले

 

 

सौं रंजना दीपक आडे

अध्यक्ष नगरपंचायत महागांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *