पुसद/ नूर कॉलनी येथे H P व Indian गॅस सिलेंडर

पुसद/ नूर कॉलनी येथे H P व Indian गॅस सिलेंडर साठवणूक करणाऱ्यावर L C B पथकाचा छापा

 

 

जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ

 

सुभाष वार्ड नूर कॉलनी पुसद येथे H P व Indian गॅस सिलेंडर साठवणूक करणाऱ्या वर L C B पथकाचा २५०. ०००₹ मुद्देमालावर छापा दिनांक १३/०३/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुसद उपविभागात अवैध धंदे, अवैध गॅस सिलेंडर साठवणुक, बाबत गोपनिय माहीती काढत १२ वाजण्याचे सुमारांस माहीती मिळाली कि, इसम नामे-आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरी अवैध गॅस सिलेंडर साठवणुक करुन काळया बाजारात जादा किंमतीने विक्री करीत आहे अशी माहीती प्राप्त झाल्याने पुरवठा निरीक्षक पुसद तसेच पंचा सह सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम नामे-आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरी अवैध भारत, एचपी (HP), व इण्डेन अशा वेगवेळया कंपनीचे 40 गॅस सिलेंडर 23 रेगुलेटर नामे-आरिफ मोहम्मद कच्ची रा. नूर कॉलनी सुभाष वार्ड पुसद ता. पुसद जि. यवतमाळ याचेकडे सदरचे गॅस बाबत विचारपूस केली असता उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागल्याने सदरचे करुन जादा दराने विक्री करीत असल्याने एकूण 40 गॅस सिलेंडर, 23 रेग्युलेटर असा अंदाजे २,५०,०००/- रु मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेवून पुरवठा निरीक्षक पुसद यांच्या तक्रारी वरुन पुसद शहर पो स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तहसिलदार पुसद रेखा वाणी मॅडम यांचे मार्गदर्शनात धिरज बांडे, शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनिल पंडागळे, रविंद्र शिरामे, राजेश जाधव या एलसीबी पथकाने नूर कॉलनी येथे छापा टाकून पुसद शहरात एलसीबी पथकाची मोठी कारवाई करून एकूण २५०. ००० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त आरोपीला ताब्यात घेतले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *