आज सुकळी (ज.) ग्रामपंचायत कार्यालयाला गटविकास अधिकारी श्री. कोळपे साहेब यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी SIR चे काम आणि आगामी दुष्काळसदृश परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. पावसाअभावी पिकांवर होणारा परिणाम, प्रशासनाची पूर्वतयारी आणि पंचनाम्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली.
श्री. कोळपे साहेबांनी SIR चे काम वेळेत आणि अचूक पूर्ण करण्याच्या तसेच परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना नेते राहुल पाटील वानखेडे यांनी शेतकऱ्यांसाठी तातडीने उपाययोजना आणि सुकळीची बंद पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी केली.
या बैठकीला डॉ. अयुबखा पठाण, चुन्नुमियाजी काजी, इंगोले साहेब, विष्णू पाटील वानखेडे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्यास दुष्काळाचा सामना करणे सोपे होईल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
तालुका प्रतिनिधी – बबलू उर्फ मोहम्मद शेख, संपर्क क्रमांक .9067934036
