कलमेश्वर महामार्गावर भीषण अपघात;

कलमेश्वर महामार्गावर भीषण अपघात; बसने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीची जोरदार धडक

 

 

कलमेश्वर तालुक्यातील काटोल-नागपूर महामार्गावर खापरी गावाजवळ एका भीषण अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. सिटी इंडिया न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास काटोलकडून नागपूरच्या दिशेने जाणारी एसटी बस क्रमांक एमएच ०७ सी ९५४० च्या चालकाने खापरी ग्रामपंचायतीसमोर अचानक ब्रेक लावला. यामुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीचा क्रमांक एमएच ४० यू २६४३ ताबा सुटला आणि ती थेट बसच्या मागील बाजूला जाऊन जोरदार आदळली.

या भीषण धडकेत दुचाकीस्वार कार्तिक शिवाजी जामगांवकर (वय १९) आणि त्याचा मित्र ओमकार नरेश कुंभे (वय १८), दोघेही राहणार उबगी, ता. कलमेश्वर हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने कलमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कलमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहनांचा पंचनामा केला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *