*सावनेर नगर परिषद हद्दीतील थकीत कर धारकासाठी अभय योजना लागू करण्यासाठी निवेदन देण्यात आले*
सावनेर, दिनांक 13/03/2026 रोज शुक्रवार 12 ते 12:30 दरम्यान सावनेर नगर परिषद यांची मुख्य अधिकारी आरशिया जुही यांना निवेदन देण्यात आले असे की, थकीत मालमत्ता कर व पाणी कर वसुली वाढवण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेली *अभय* योजना सावनेर नगर परिषद क्षेत्रात प्रभावीपणे राबवण्यासाठी सावनेर नगर वासीयाकडून वॉइस ऑफ मीडिया यांचे नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री दिलीप जी घोरमाडे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले, नागरिकांच्या मते अभय योजनेबाबत जनजागृतीसाठी नगर परिषदे कडून विशेष मोहीम राबविणे, थकित करधारिकांना सूचना देणे, तसेच कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत कर थकबाकीदारांना दंड व व्याजामध्ये सवलत देऊन थकित रक्कम भरण्याची संधी मिळते त्यामुळे अनेक नागरिक आपला थकीत कर भरू शकतात व नगरपरिषदेच्या महसुलातही वाढ होऊ शकते यामुळे थकीत कर वसुलीला गती मिळून नगरपरिषदेच्या विकास कामाला आर्थिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. निवेदन,व्हॉइस ऑफ मीडियाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष दिलीप घोरमाडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले व व्हॉइस ऑफ मीडिया सावनेर तालुका समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे सावनेर.
