बोरी बंदला उत्कृष्ट प्रतिसाद! बंजारा आरक्षणासाठी बोरी कडकडीत बंद

*बोरी बंदला उत्कृष्ट प्रतिसाद! बंजारा आरक्षणासाठी बोरी कडकडीत बंद

 

बोरी प्रतिनिधी – मनोज टाक*

 

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी संघर्षयोद्धा विनोद भाऊ आडे यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी बोरी येथे पुकारण्यात आलेल्या बंदला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे.

 

सकाळी 7 वाजल्यापासूनच बोरी शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, नागरिक आणि समाजबांधवांनी स्वयंफूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवून या बंदला जाहीर पाठिंबा दिला.

 

*व्यापाऱ्यांचे सहकार्य:*

बोरीतील व्यापारी संघटनेने सोयिस्कर निवेदन देत, “हा बंद कोणाच्याही विरोधात नाही, तर आमच्या बंजारा समाजबांधवांच्या हक्कासाठी आहे” असे म्हणत शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले होते. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून समाजाच्या लढ्याला बळ दिले.

 

दरम्यान, बोरी पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक: अभिजित अडके .व आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याबाबत नोटीस बजावली होती. जबरदस्तीने दुकाने बंद करणे, रास्ता रोको, टायर जाळणे याला मनाई करण्यात आली असून, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आंदोलनकर्त्यांनी देखील पोलिसांच्या सूचनांचे पालन करत शांततेत हा बंद यशस्वी केला.

 

या बंदमुळे बोरी परिसरात बंजारा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठी चर्चा रंगली असून, शासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *