*तालुका स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत अधिराज चौधरी ने मिळविले यश*
बोरी प्रतिनिधी . मनोज टाक
*बोरी-* येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेचा विद्यार्थी अधिराज गजानन चौधरी याने शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. अधिराज ने या स्पर्धेत चार शाळांच्या विद्यार्थ्यांसोबत विजय मिळवला.शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण रांजवण व क्रीडा शिक्षक श्री. बि. एन. सोन्ने यांचे आधिराज ला मार्गदर्शन लाभले.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील रहिवाशी अधिराज गजानन चौधरी याने तालुकास्तरीय स्पर्धेत यश मिळविल्यामुळे त्याची मंगळवार दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी परभणी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.. या यशाबद्दल तालुका क्रीडा अधिकारी श्री. मिलिंद साळवे, तालुका क्रीडा मार्गदर्शक शेख शहारुख, बोरीचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण रांजवन, शंकर खिस्ते, क्रीडा शिक्षक श्री. बि. एन. सोन्ने आदींनी अधिराज चे अभिनंदन केले आहे.
*छायाचित्र*
*बोरी-* तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अधिराज चौधरी चे तालुका क्रीडा अधिकारी श्री. मिलिंद साळवे, मुख्याध्यापक श्री. प्रवीण रांजवन व क्रीडा शिक्षक श्री. बी. एन. सोन्ने यांनी अभिनंदन केले.
