पोलीस स्टेशन सावनेर अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या ०९ आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद,

*पोलीस स्टेशन सावनेर अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या ०९ आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद, सावनेर पोलीसांची कामगिरी.*

दिनांक ०३/०९/२०२६ रोजी सावनेर पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, अकिल वल्द रज्जाक कुरेशी यांचे राहते घर वार्ड क. ११, कसाईपुंरा सावनेर, ता. सावनेर येथे काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सावनेर पोलीस घटनास्थळी पोहचले असता, नमुद घटनास्थळी काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना दिसुन आले. पोलीसांनी आरोपी नामे १) अनिस वल्द सलीम कुरेशी, वय ३० वर्ष, २) दानिश वल्द युसुफ कुरेशी, वय २२ वर्ष, ३) साबीर वल्द गफार कुरेशी, वय २२ वर्ष, ४) समीर वल्द अकिल कुरेशी,

२२ वय २० वर्ष, ५) मोनिश वल्द युसुफ कुरेशी, वय २२ वर्ष, ६) अकिल वल्द रज्जाक कुरेशी, वय ५० वर्ष, ७) आबीद वल्द गफार कुरेशी, वय २३ वर्ष ८) आसिम वल्द सलाम कुरेशी, वय २४ वर्ष, ९) रिजवान वल्द रज्जाक कुरेशी, वय २६ वर्ष, सर्व रा. वार्ड क. ११, कसाईपुंरा सावनेर, ता. सावनेर यांना ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना जागीच पकडले. पोलीसांनी घटनास्थळावरून ५२ तासपत्ते आणि रोख रक्कम २६३०/- रूपये असा एकुण २६८०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद ०९ आरोपीतांविरूद्ध पोलीस स्टेशन सावनेर येथे कलम ४,५ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रतिनिधी अनुप पठाने सावनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *