नारीशक्तीचा सन्मान… समाजाच्या प्रगतीचा भक्कम पाया!

नारीशक्तीचा सन्मान… समाजाच्या प्रगतीचा भक्कम पाया!

महाराष्ट्राचे लाडके लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनसेवा सप्ताह’ अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वसमतच्या वतीने आणि लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली “नारीशक्ती सन्मान सोहळा” वसमत येथील सुरमणी दत्ता चौगुले सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

याप्रसंगी सौ. वर्षाताई राजूभैय्या नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सौ. मंगलाताई खानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली समाजातील शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, उद्योग, शेती, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ज्या समाजात महिलांना सन्मान, समान संधी आणि सुरक्षित वातावरण मिळते, तो समाजच खऱ्या अर्थाने प्रगत आणि सक्षम बनतो. नारीशक्तीचा गौरव हा केवळ सत्कार नसून समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा दृढ संकल्प आहे.”

महिलांचे सक्षमीकरण हेच सशक्त समाज आणि विकसित राष्ट्राचे आधारस्तंभ आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या जनसेवेच्या प्रेरणादायी विचारांना मार्गदर्शक मानत लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या नेतृत्वाखाली वसमत विधानसभा मतदारसंघात महिला सन्मान, स्वावलंबन आणि सर्वांगीण विकासासाठी असे लोकहितकारी उपक्रम सातत्याने राबविले जातील.

“नारीशक्तीचा सन्मान म्हणजे राष्ट्रशक्तीचा अभिमान… आणि महिलांचा विकास म्हणजे वसमतच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेला भक्कम पाया!”

जनसेवा_सप्ताह नारीशक्ती_सन्मान महिला_सक्षमीकरण स्व_अजितदादा_पवार आमदार_राजूभैय्या_नवघरे वसमत

 

अन्य सम्मानित उपस्थित सदस्य:

 

श्रीमती संगीता मैडम

 

श्रीमती बडवणे काकू

 

श्रीमती कुसुमताई पडोळे

 

श्रीमती रेणुका ताई पतंगे

 

श्रीमती रुक्मिणी ताई भोसले

 

श्रीमती सारिका ताई चव्हाण

 

श्रीमती सारिका हळवे

 

श्रीमती उत्कर्षाताई बाहेती

 

श्रीमती कांचन ताई शिंदे

 

श्रीमती ती मल्ले ताई

 

श्रीमती आशाताई देशमुख

 

श्रीमती नसीम बेगम

 

श्रीमती रुपाली दगडू दगडू

 

कु. स्नेहा मनोहर

 

श्रीमती जयमाला गोरे

 

श्रीमती अश्विनी ठाकुर

 

श्रीमती सुमन पापळे

 

श्रीमती ऋतुजा ताई होरे

 

श्रीमती जयश्रीताई बेडे

 

श्रीमती कौसल्याताई हरो

 

श्रीमती रिमाताई जाधव

 

श्रीमती गायत्री होरे

 

श्रीमती प्रतिभा मानवते

 

श्रीमती चंचल बोंगणे

 

श्रीमती राजश्री कदम

 

श्रीमती ज्योति वाघुळे

 

श्रीमती नंदाताई कुले

 

छाया नागेश चव्हाण वसमत

प्रतिनिधी सचिन घारपुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *