मॉडिफाई सायलेंसर लावणा-यांवर पोलीसांची कारवाई;५ दुचाकी वाहतूक शाखेत जप्त
गोंदिया, दि. ४ सप्टेंबर : गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकलींना मॉडिफाई सायलेंसर लावून वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले असून, या सायलेंसरच्या फटाक्यासारख्या मोठ्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक शाखेने गोंदिया शहरात विशेष कारवाई केली.
जिल्हा वाहतूक शाखा, गोंदिया यांच्या पथकाने मॉडिफाई सायलेंसर लावून वाहन चालविणाऱ्या एकूण ५ मोटारसायकलींवर कारवाई करून संबंधित वाहने वाहतूक शाखेत डिटेन केली आहेत. या कारवाईमुळे मोठ्या आवाजात वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गौरव भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांच्या नेतृत्वाखाली श्रेणी पोलीस निरीक्षक श्रावण गोडाम, छत्रपालसिंग चंदेल, पोलीस हवालदार जफरअली सैय्यद (११३७), पोलीस हवालदार गणेश काकडे (१५५), पोलीस हवालदार अमित मुजारिया (२०९), पोलीस हवालदार आनंद बावनथडे (४१३), पोलीस हवालदार गणेश लिल्हारे (५७३), पोलीस हवालदार प्रेमलाल ताराम (१२२२), पोलीस शिपाई मनीष मारवाडे (१५०), पोलीस शिपाई जयराम मंजरे (१०९४), पोलीस शिपाई अरविंद तावाडे, पोलीस शिपाई विवेक कटरे (७२६), पोलीस शिपाई प्रविण वाढीवे (१८७९), पोलीस शिपाई उमेश गजभिये (१३२३), चापोशि विनोद हरिणखेडे (१३२०) आणि चापोशि विक्की दगडे (५१८) यांनी ही कारवाई केली.
गोंदिया जिल्हा. प्रतिनिधि महादेव शेन्डे
