करडी पोलिसांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई

करडी पोलिसांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई

एकूण 14,12,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

भंडारा:- करडी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना स्टॉप मौजा मुंडरी बुज ब्रिज खाली उभे असताना एक निळ्या पांढऱ्या रंगाच्या विना नंबरचा स्वराज 742 कंपनीचा ट्रॅक्टर मौजा मुंडरी येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून विना रॉयल्टीने अंदाजे एक ब्रास रेती किंमत सहा हजार रुपये वाहतूक करताना मिळून आला, व त्याला जोडून असलेली ट्रॉली अंदाजे किंमत एक लाख रुपये,तसेच मुंढरी बुज ते रोहा कडे जाणारा डांबरी रोड येथे पोलीस स्टाफ सह उभे असताना यातील आरोपी हा त्याच्या एका निळ्या पांढऱ्या रंगाच्या विना नंबरच्या स्वराज 742 कंपनीच्या ट्रॅक्टर मध्ये मौजा मुंढरी येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून विना रॉयल्टी अंदाजे एक ब्रास रेती किंमत सहा हजार रुपये ची चोरून वाहतूक करताना मिळून आला. शासनाच्या महसूल बुडवून पर्यावरणाच्या ऱ्हास करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून एक निळ्या पांढऱ्या रंगाच्या विना नंबरच्या सोनालिका कंपनीचा किंमत सहा लाख रुपये ज्याला विना नंबरची निळ्या रंगाचे ट्रॉली जोडलेली किंमत एक लाख रुपये असा एकूण 14,12,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने ट्रॅक्टर चालक आरोपी नामे गजानन लीलाधर सार्वे वय 46 वर्ष राहणार सकरला तालुका मोहाडी जिल्हा भंडारा, आरोपी क्रमांक दोन विकास शालिकराम गाढवे वय तीस वर्ष राहणार धर्मापुरी, तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यांचे विरुद्ध करडी पोलीस पोलीस स्टेशन येथे

फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून अपक्रमांक 106/2026 कलम 303(2), भान्यास. सह कलम 47,48 महा. महसूल अधिनियम 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम कलमान्वये दोन्ही ट्रॅक्टर आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरूल हसन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनात करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री नागलोत साहेब यांच्या चमूने ही कारवाई पार पाडली.

 

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *