वडोदा येथे शुद्ध लेखन स्पर्धा यशस्वी

वडोदा येथे शुद्ध लेखन स्पर्धा यशस्वी

राधेशाम गाडबैल सार्वजनिक वाचनालय चा उपक्रम

कामठी ७ एप्रिल

कामठी तालुक्यातील वडोदा येथे राधेशाम गाडबैल सार्वजनिक वाचनालय तर्फे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ” मराठी शुध्द लेखन स्पर्धा ” चे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय वडोदा येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच राजु थोटे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विशाल गाडबैल व प्रमुख पाहुणे दत्तू हलमारे उपसरपंच, राजेश निषाणे सदस्य, अर्चना गाडबैल उपस्थित होते. अर्चना गाडबैल यांनी स्पर्धा विषयक माहिती दिली व शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये १०० मुला मुलीनी सहभाग घेतले. प्रथम बक्षिस ₹ ३००१, व्दितीय बक्षिस ₹ २००१, व त्रित्तिय बक्षिस ₹ १००१ व टॉफी देण्यात आली. काही मुला मुलींना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी अढाउ यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मिता सहारे यांनी मानले.

कामठी तालुका प्रतिनिधी

दिलीप मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *