अनेक वर्षापासून दिव्यांग लाभार्थी वंचित गटविकास अधिकाऱ्याकडे चौकशीची मागणी

अनेक वर्षापासून दिव्यांग लाभार्थी वंचित गटविकास अधिकाऱ्याकडे चौकशीची मागणी

 

 

Ct india News प्रतिनिधी मोहमद शेख उमरखेड

 

 

उमरखेड तालुक्यातील तसेच चिंचोली (संगम) येथील ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थी यांना शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी ५% निधी हा राखीव ठेवणे बंधनकारक असून त्या निधीतून दिव्यांगाना घरकुल, स्वयंरोजगार, शैक्षणिक साधने, कृत्रिम अवयव आणि वैद्यकीय मदतीचे शासनाकडून वेळोवेळी निर्देश निर्गमित करण्यात आलेले असून सुद्धा त्याची कुठल्याही प्रकारची अमलबजावणी करण्यात आली नसल्याने चिंचोली (संगम) येथील २५ ते ३० दिव्यांगाना ग्रामपंचायतीच्या मागील पंचवार्षिक काळामध्ये कुठल्याही प्रकारचा लाभ देण्यात आला नसून, त्यांची नोंदणी सुद्धा करण्यात आली नसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. रिपब्लिकन युवा सेनेच्या नेतृत्वात संबंधित गंभीर बाब ही उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देत त्याविषयी आग्रही भूमिका घेण्यात आली. मागणीची तात्काळ दखल घेत गटविकास अधिकारी यांच्याकडून २० मार्च २०२६ रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या बैठकीचे निर्देश देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष ठमके, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे,

चिंचोली (संगम) येथील शाखाध्यक्ष गणेश नावडे, शाखा उपाध्यक्ष विलास सोनटक्के, शाखा सदस्य उत्तम सूर्य, विनोद गाडगे, सुरेश डोंगरे, मिलिंद नवसागरे, प्रकाश कदम, गंगाधर नवसागरे, अमोल नवसागरे, संघर्ष नवसागरे, बबन खडसे, मनोज लहानकर, सगुना नवसागरे, माधवी आडकिने, समृद्धी नवसागरे, मनिषा चिंचोलकर, प्रज्ञा नवसागरे, विद्या खडसे तसेच मोठ्या संख्येने तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *