महागावात अवैध धंद्यांचे जाळे; स्थानिक नागरिक त्रस्त, बीट व्यवस्थेवरही उपस्थित झाले प्रश्नचिन्ह

महागावात अवैध धंद्यांचे जाळे; स्थानिक नागरिक त्रस्त, बीट व्यवस्थेवरही उपस्थित झाले प्रश्नचिन्ह

 

महागाव | Ct India News

जिल्हा प्रतिनिधी : एस. के. शब्बीर, यवतमाळ

 

 

महागाव शहरात अवैध धंदे आणि वाढती गुन्हेगारी यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा असून, यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील काही भागांत अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याने अनेक कुटुंबांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

काही नागरिकांनी शहर बीटच्या कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित करत, अवैध धंद्यांवर केवळ दिखाऊ कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

महागाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अवैध व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि त्यांना मदत करणाऱ्या घटकांविरुद्ध विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *