जन आंदोलन समितीच्या वतीने वृद्ध व्यक्तीचा 65 वा जन्म दीन उत्साहात साजरा
महागाव प्रतिनिधी एस के शब्बीर
महागांव तहसील परिसरात सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत आपल्या कर्तृत्वाने समाजात वेगळी ओळख निर्माण केलेल्या बहुगुणी व्यक्तिमत्वाचे श्री रवी भाऊ बनसोड यांचा ६५ वा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण तहसील कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. हा उपकार्यक्रम जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश भाऊ नरवाडे यांच्या पुढाकारातून आयोजित केला आहे
आपल्या प्रभावी वाणीवर प्रभुत्व असलेले रवी बनसोड हे जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या विविध सामाजिक आंदोलनांमध्ये खंबीरपणे नेहमीत सहभागी रहातात आज रोजपर्येंत अनेक समाजातील प्रश्नांवर आवाज उठवत आले आहेत. त्यांच्या मागील अंगरक्षक कलाकारातून आर्केस्ट्रा कलाकार, शिक्षक, प्रामाणिक पत्रकार तसेच आर्जनवीस म्हणून त्यांनी समाजात रवी बनसोड. यांची वेगळी छाप महागाव शहरात आहे आता पर्येंत समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि लोकांप्रती असलेली त्यांची निस्वार्थ भावना या मुळे त्यांचे व्यक्तिमत्व अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना
यावेळी जगदीश भाऊ नरवाडे, भारत कावळे (API नाशिक), कॉम्रेड डी. बी. नाईक (माजी सभापती महागाव), सुरेश भाऊ खंदारे, चंद्रकांत गिरी, रहीम पठाण, जहागीर खान पठाण, बंटी पठाण सुरेश इंगोले. श्रीराम इंगोले.अतुल पाटील शिंदे यांच्या सह अनेक कार्यकर्ते व उपस्थित होते.
आपुलकीच्या वातावरणात साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
