करडी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई; ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

करडी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई; ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

करडी (भंडारा): पोलीस स्टेशन करडी अंतर्गत अवैध व्यवसायांविरुद्ध धडक मोहीम राबवत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मोहा फुलाची हातभट्टी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी, असा एकूण ७१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, करडी पोलिसांनी मौजा आंबेडकर वार्ड येथे धाड टाकली. यावेळी दोन आरोपी संशयास्पदरित्या मिळून आले. त्यांच्याकडून काळ्या रंगाच्या ट्यूबमध्ये असलेली अंदाजे ३० लिटर मोहा फुलाची हातभट्टी दारू (किंमत ६,००० रुपये) जप्त करण्यात आले.

 

अवैध दारू: ३० लिटर (किंमत ₹६,०००/-)

वाहन: लाल रंगाची HF डिलक्स दुचाकी (क्र. MH36 AD 9944, किंमत ₹६५,०००/-)

एकूण किंमत: ७१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींची नावे:

१) आशिष मधुकर धावळे (वय ३५ वर्षे, रा. माता वार्ड, करडी)

२) शिल्पा शिशुपाल राऊत (वय २५ वर्षे, रा. आंबेडकर वार्ड, करडी)या प्रकरणी आरोपींविरुद्ध करडी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक १५६/२०२६, कलम ६५(अ) मदाका अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे आणि सपोनि. नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली चापोशि. कोचे व त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करडी पोलीस करत आहेत.

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *