न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथे “सॉफ्ट स्किल्स महिंद्रा प्राईड

न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथे “सॉफ्ट स्किल्स महिंद्रा प्राईड क्लासरूम प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न”

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

 

हिंगोली दिं 10 मार्च रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व्दारा संचलित न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथे कौशल्य विकास केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि नांदी फॉउंडेशन, हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींसाठी आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय ‘सॉफ्ट स्किल्स महिंद्रा प्राईड क्लासरूम प्रशिक्षण कार्यक्रम’ दि. ०५ ते ०७ मार्च दरम्यान संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच विद्यापीठ कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेंद्र गट्टाणी यांचे मार्गदर्शन मिळाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस. सोळंके यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. वेळेचे व्यवस्थापन महत्वाचे आहे. वेळेचा सपयोग करा. जेव्हा तुम्ही समरस होऊन कोणते कौशल्य आत्मसात करता तेव्हा ध्येय, इच्छा, प्रगती याबाबीं साध्य होतात. ध्येय निश्चित प्राप्त होते त्यासाठी इच्छाशक्ती पाहीजे. ही इच्छाशक्ती, कौशल्य विद्यार्थ्यांनी वृध्दींगत करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एस.जी. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थीनींमध्ये संवाद, टीमवर्क, नैतृत्व, मुलाखत कौशल्य विकसित करून रोजगार योग्यता वाढवुन सक्षम बनविणे हा प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश होता. या तीन दिवस चाललेल्या प्रशिक्षणात प्रशिक्षक तुषार इंगळे यांनी करिअरसाठी इंग्रजी भाषा, प्रभावी संवाद कौशल्य, मुलाखत कौशल्य, वेळ व पैसा व्यवस्थापन, गटचर्चा, रोजगार, संधी, चिकीत्सक विचारसरणी, व्यक्तीमत्व विकास, देहबोली याविषयांवर विविध कियाकलाप, उपक्रम घेत मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल नेहा मस्के, श्रेया आगलावे, सिदरा पठाण, दिव्या घोडके, वैष्णवी पायघन, चंद्रकला जाधव या विद्यार्थीनींनी अनुभव तसेच प्रा. शिर्के, प्रा. एस. आर. काळबांडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. एस.जी. पाटील यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात एकुण ६० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. यावेळी प्रशिक्षण पुर्ण केलेल्या सर्व विद्यार्थीनींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थीनींना ‘वर्धिनी ट्रॉफी’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. पवन वासनिक, प्रा. बी.बी. चव्हाण, डॉ. आर.डी. कोल्हें, डॉ.इर्शाद बेग, प्रा. सुभाष मापारी, प्रा. अतिष कदम, प्रा. यु. डी. किरवले, प्रा. करंडे, प्रा. गोपाल जाधव, डॉ. सिंध्दार्थ खंदारे, प्रा. शेख जुनेद, इत्यादी उपस्थित होते. कार्यकम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस. सोळंके, समन्वयक प्रा. एस. जी. पाटील, डॉ. पवन वासनिक यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *