दिग्रस/ झीरपुवाडी ग्रा. पं.येथे महिला दिना निमित्त ६० महिलाना साडी चोळी देऊन केले सन्मानित
विशेष जिल्हा प्रतिनिधी राम चव्हाण महागाव
दिग्रस तालुक्यातील झिरपुवाडी ग्रामपंचायत येथे प्रशासक पुरुषोत्तम पुडवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनानिमित्त साडी चोळी देऊन ६० महिलांना केले सन्मानित
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर झीरपुवाडी येथील विविध क्षेत्रात व दिव्यांग, विधवा तसेच शासकीय नोकरी करणाऱ्या महिलांना साडीचोळी चे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन रुपेश राठोड तसेच ग्रामपंचायत झिरपुरवाडी संयुक्तपणे केले होते. गावातील विविध क्षेत्रातील ६० महिलांना सन्मानित करण्यात आले. सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासक पुरुषोत्तम कुडवे, प्रमुख पाहुणे डॉ. संजय कांबळे, रुपेश राठोड, प्रा. उमेश ठाकरे, कान्हुजी मिरासे, विलास डहाणे, रोजगार सेवक शंकर जुडे कारभारी हरी भाऊ राठोड, काजल दुर्गे, पो. पाटील वच्छला मिरासे, आशा सेविका सुनिता बोरचाटे, महानंदा टोगळे, मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राठोड तर प्रास्ताविक काजल दुर्गे यांनी केले. आज महिलांचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल या पुरते मर्यादित राहिले नाही. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजकारण, राजकारण तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ग्रामीण महिलांनाही आपण कुठेही कमी नाही हे लक्षात घेऊन समाजाला दिशा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. संजय कांबळे यांनी केले.समाजातील अनेक महिलांनी स्वतःची क्षेमता ओळखुन निवडलेल्या क्षेत्रात व प्रमाणिक प्रयत्नांच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन केले पाहिजे. महिलांनी पुढे येत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी.तसेच प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे ही बाब कौतुकास्पद आहे. आणि ज्ञान व हक्कांबाबत जागृरुकता निर्माण हवी,असे प्रतिपादन ग्राम पंचायत झिरपुरवाडी चे प्रशासक पुरुषोत्तम कुडवे यांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील युवकांनी एकत्र येऊन पार पाडले.
