भंडारा शहर पोलिसांनी सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला

भंडारा शहर पोलिसांनी सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला केली अटक….!!!!

एकूण 19,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त……!!!!

 

भंडारा:- भंडारा शहरात घडणाऱ्या सायकल चोरीच्या घटनांचा छळा लावण्यात पोलिसांना यश आले असून, एका सराईत सायकल चोरट्याला अटक करण्यात आली असून फिर्यादी संदीप प्रभाकर पुसदकर राहणार शास्त्री नगर भंडारा,यांनी दिलेल्या तक्रारी नुसार ,त्यांचा मुलगा पार्थ हा दि.11 मार्च 2026 रोजी सायंकाळी माटेवार नगर,प्रगती कॉलोनी येथे मित्रा कडे गेला असता त्याने घराबाहेर ठेवलेली हिरो कंपनीचे लाल रंगाची सायकल किंमत 7000/- रुपये, अज्ञात व्यक्तीने चोरून नेली, याप्रकारे भंडारा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 675/2026 कलम 303(2)भारतीय न्याय संहिता अन्वये गून्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुळसीदास मोहेरकर आणि त्यांचे पथकाने तातडीने तपासाला सुरुवात केली. घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले, सायकल चोरी करणारा इसम त्यात दिसून आले. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे सदर संसहित आरोपी सिल्ली अंबाडी येथील असल्याची खात्री मिळाली, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पराग पुरुषोत्तम हुमने वय 38 वर्ष राहणार सिल्ली अंबाडी तालुका जिल्हा भंडारा, याला 13 मार्च 2026 रोजी अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी तीन सायकली जप्त केली. यामध्ये फिर्यादीची 7000/- हजार रु. किंमतीची हिरो मेक कंपनीची लाल रंगाची सायकल, अंदाजे पाच हजार रुपयाची जुनी मॅक्सट्रो एक्स कंपनीची सायकल, आणि अंदाजे पाच हजार रुपये किमतीची हिरो मे कंपनीची ब्लॅक सिल्वर रंगाची सायकल असा एकूण 19,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *