नवनियुक्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कामठी तालुका

नवनियुक्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कामठी तालुका नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला

संबंधित अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले कामठी

दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने कामठी तालुक्यातील कन्हान व नाग नदीला महापूर येऊन विविध गावातील नागरिक महापुरात अडकल्याने प्रशासनाची मोठी कोंडी निर्माण होत असते. त्यासाठी कामठी तालुका नैसर्गिक आपत्ती समितीच्या वतीने बोट व नावेतून नागरिकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य करण्यात येत असते ती परिस्थिती आगामी पावसाळ्यात निर्माण होऊ नये याकरिता नागपूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतीच कामठी तालुका नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य उचित मार्गदर्शन केले. दरवर्षी पावसाळ्यात नाग नदी व कन्हान नदीला महापूर येऊन कामठी तालुक्यातील खेडी, पांधुरणा, सोनेगाव राजा, बीड बिना , पावनगाव ,भाजी मंडी, येरखेडा- रनाळा बागडोर नाल्याला महापूर येऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक संपत्ती चे नुकसान होऊन शेकडो नागरिक पुरात अडकून पडत असतात. त्यामुळे तालुका प्रशासनाची मोठी तारांबर उडत असते या वर्षीही पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता कामठी तालुका नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कामठी तालुक्यातील खेडी, पांढुरणा गट ग्रामपंचायत येथे भेट देऊन पूर ग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. व कामठी तहसील कार्यालयामार्फत कामठी नगर परिषद सभागृहात आयोजित व्यवस्थापन आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य उचित मार्गदर्शन केले. खेडी ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक व ज्येष्ठ विस्तार अधिकारी प्रवीण गावंडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी विकास महामुनी यांच्या शाल ,श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आढावा बैठकीला कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे ,नायब तहसीलदार राजाराम बमनोटे, अमर हाडा ,मयूर चौधरी ,सारिका धात्रक कामठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब येवले ,कामठी नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी एस. फटींग, अग्निशामक अधिकारी एस. उरकुडे ,वडोद्याचे ठाणेदार मनोज महागावे, नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, जुनी कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे, कृषी अधिकारी पंकज लोखंडे ,ज्येष्ठ विस्तार अधिकारी व खेडीचे प्रशासक प्रवीण गावंडे , तालुका भूमिअभिलेख अधिकारी एस. मेहरकुळे सह विविध गावातील सरपंच , ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीचे प्रास्ताविक तहसीलदार गणेश जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गटविकास अधिकारी बाळासाहेब येवले यांनी मानले.

कामठी तालुका प्रतिनिधी – दिलीप मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *