विविध जाती धर्माच्या नागरिकांनी मतभेद विसरून सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करावे- सहाय्यक पोलीस उपायुक्त अंकुश खेळकर कामठी
विविध जाती धर्माच्या नागरिकांनी आपली मतभेद विसरून शासनाच्या नियमाचे पालन करून आगामी बकरी ईद व विविध सन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान सहाय्यक पोलीस उपायुक्त अंकुश खेडकर यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता समितीच्या सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले. सहाय्यक पोलीस उपआयुक्त अंकुश खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शांतता समितीच्या सभेत नगरसेवक नियाज कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे इर्शाद कुरेशी, रनाळा ग्रामपंचायतचे सदस्य अमीर खान यांनी आगामी २८ मे ला होणाऱ्या बकरी ईद सणा निमित्त शहरात पाणी ,रस्ता, स्वच्छता व वाहतूक व्यवस्थेविषयी समस्या ठेवली असता कामठी नगर परिषदेचेस्वच्छता निरीक्षक विनोद मेहरोलिया यांनी सांगितले की ,कामठी नगर परिषदेच्या वतीने आपण ठेवलेल्या विविध समस्या त्वरित सोडवण्यात येतील व स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी कचरा गाड्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार असल्याचे सांगितले. सभेला विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता एस. राठोड ,नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, जुनी कामठी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे ,वाहतूक पोलीस निरीक्षक एस. बनसोड सह शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचे प्रास्ताविक नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी केले संचालन अखिलेश ठाकूर यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगळे यांनी मानले.
कामठी तालुका प्रतिनिधी – दिलीप मेश्राम
