महागाव/ काळी( दौ.)येथे छत्रपती शिवाजी महाराज अभियान शिबिर चा २ टप्पा लाभार्थ्यांना फायद्याचा ठरला आहे
प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव
ठरला आहे.महागाव तालुक्यातील काळी दौलत येथे दिनांक १४ मार्च २०२६ रोजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान – चा २ टप्प्याला 1000 ते 1200 लाभार्थ्यांची गर्दी
अंतर्गत मंडळनिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांच्या मालिकेत काळी (दौलत) ग्रामपंचायत येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अभय मस्के यांनी केले होते
या शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातढ निकाली काढण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांना ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ द्वारे विविध सेवा उपलब्ध करून आज रोजी दिल्या आहेत. शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, ७/१२ व ८अ उताऱ्यांतील त्रुटी दूर करणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क तसेच डिजिटल उतारे तात्काळ उपलब्ध करून काळी दौलत सर्कलमध्ये दगावलेल्या जनावराचा धनादेश लाभार्थ्यांना चेक द्वारे तहसीलदार अभय मस्के साहेब यांनी दिले आहे. यासोबतच नागरिकांना उत्पन्न, रहिवासी, जात व क्रीमीलेअर प्रमाणपत्रे, सामाजिक अर्थसहाय्य योजना, ई-मोजणी,
अॅग्रीस्टॅक, पीएम किसान तसेच तक्रार निवारण सेवा आजच्या दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध करून दिले आहे..यावेळी
वनविभाग परिक्षेत्र काळी दौलत कामगार विभाग एसटी महामंडळ ग्राम विकास पंचायत समिती कृषी विभाग महावितरण भूमी अभिलेख
पुरवठा विभाग संजय गांधी निराधार विभाग महसूल विभाग सुकन्या समृद्धी योजना सेतू विभा ग वित्तीय साक्षरता केंद्र आरोग्य विभाग पशुधन विभाग बँक प्रतिनिधी आजच्या काळी दौलत शिबिरामध्ये उपस्थित होते
