हिंगोलीच्या सुनीता मुळे ह्यांना शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली येथील ज्येष्ठ समाजसेविका सुनीता माणिकराव मुळे ह्यांना महाराष्ट्र शासना कडून २०२५ चा ज्ञान ज्योती सावत्रीबाई पुरस्कार जाहीर झाला असून त्या वर्षातील मराठवाड्यातून सुनीता मुळे एकमेव पुरस्कारार्थी असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग अवर सचिव हे.सु.पाठक ह्यांनी १३ मार्च ला परिपत्रक जारी केले असून ह्यात २०२३- २४ व २०२४- २५ चे एकूण ११ पुरस्कार प्रत्येक महसूल विभागातून एका पुरस्कारार्थींची निवड जाहीर केलीआहे. सुनीता मुळे ह्या हिंगोली येथील सार्वजनिक शिव जयंतीच्या पहिल्या महिला अध्यक्षा असून त्यांनी यावर्षी जयंती महोत्सव पूर्णतः महिलां पदाधिकाऱ्यांना सामील करून यशस्वी रित्या संपन्न केलाआहे. त्या सामाजिक शैक्षणिक,औद्योगिक,स्पोर्ट्स,योगा आदी सह अनेक राष्ट्रीय कार्यात मागील अनेक दशके सेवारत आहेत. भाजपच्या त्या जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.ग्राहक पंचायत महाराष्ट्र,आदी क्षेत्रात ही त्यांनी कामगिरी बजावली आहे.पती माणिकराव मुळे ह्यांच्या निधनानं नंतर त्यांनी पतीचा लोखंडाचा व्यवसाय आणि परिवाराचे व्यवस्थापन करून मुला बाळांना व परिवाराला सुद्धा समाजसेवा करत उभारी दिली आहे.महिला व बालकल्याण तसेच अनेक शैक्षणिक उपक्रमात त्या निरंतर सेवारत असून पेराल ते उगवेल अशी अनुभूती त्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्ती मुळे झाल्याचे मुळे ह्यांनी म्हंटले.ह्या अगोदर त्यांना शासनाने त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित केलं आहे.आजवर त्यांना इतरही ९ पुरस्कार मिळाले असून राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक संघटनेच्या त्या पदाधिकारी आहेत. त्यांच्या ह्या यशा प्रीत्यर्थ त्यांचे हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे,खासदार रामरावजी वडकुते,कळमनुरीचे आमदार संतोषराव बांगर, माजी आमदार डॉ.जयप्रकाश मुंदडा व गजाननराव घुगे, महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाचे राज्य कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार,ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे जिल्हाध्यक्ष ॲड व आर. एन.अग्रवाल,राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी एम.एम.राऊत,बाल संरक्षण समिती सदस्य परसराम हेम्बाडे ,सौ.साधना हेम्बाडे,सौ सीमा वडतकर मराठा महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खंडेराव सरनाईक,व पदाधिकारी ढोकर पाटील व सर्व सदस्य,मराठा सेवा संघ ,जिजाऊ ब्रिगेड,मराठा सेवा संघ,पत्रकार मंडळी,केदारनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड स्वप्नील गुंडेवार,खंडेलवाल ज्वेलर्स प्रतिष्ठानचे मालक धनराज खंडेलवाल, राजेश व आदित्य खंडेलवाल,प्राचार्य विलास आघाव,माजी प्राचार्य विक्रम जावळे,सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी संपादिका शांतबाई मोरे अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी राधिका चिंचोलीकर,आदर्श शिक्षक पंडित अवचार,व्यापारी महासंघ,आदींनी अभिनंदन केले आहे.सदरील पुरस्कार येत्या १६ मार्च ला मुंबई येथे राज्यस्तरीय समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांना देण्यात आल्याचे सुनीता मुळे ह्यांनी सांगितले.
