धर्मवीर संभाजी राजेंचा मृत्यूही इतिहासात अजरामर ठरला

शेख गफार शेख सत्तार.

 

धर्मवीर संभाजी राजेंचा मृत्यूही इतिहासात अजरामर ठरला. शिव विचारवंत जोहरे.

 

धर्मवीर संभाजी महाराज आणि सावित्रीमाईंना सामाजिक चळवळींचे प्रबोधनातून अभिवादन.

 

बुलढाणा

धर्म आणि स्वराज्यासाठी, छत्रपती शिवरायांच्या अस्मितेसाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी चाळीस दिवस इतिहासातील हृदयद्रावक मरण यातना भोगल्या. ज्यामुळे संपूर्ण मराठा साम्राज्यामध्ये आलेली मरगळ बाजूला सारून पुन्हा मराठा साम्राज्यातील मावळ्यांमध्ये स्वाभिमान आणि अस्मितेची ज्वाला प्रज्वलित झाली. धर्मवीर संभाजीराजेंचा मृत्यूही अजरामर ठरला त्यामुळेच आजही बलिदान मास चाळीस दीवस पाळला जातो.असे मत बहुजन चळवळीचे अभ्यासक,शिवविचारवंत ईंजी.शिवाजी जोहरे यांनी व्यक्त केले.

धर्मवीर संभाजी महाराज स्मृतिदिन आणि विद्येची देवता सावित्रीमाई फुले अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक चळवळींच्या संयुक्त विद्यमानाने 11 मार्चला सायंकाळी बुलढाण्यातील महात्मा फुले व्यावसायिक संकुलात करण्यात आले होते.

यावेळी विचारवंत जोहरे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. यावेळी शिवव्याख्याते अँड.सतीशचंद्र रोठे पाटील, शिव विचारवंत विशाल राणे, नारायणराव भाकडे, विठ्ठल वाघ, सुभाष भागीले,ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे, वारकरी धर्म परिषदेचे गोपाल महाराज कचोरे,भगवान इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांसह अभिवादन पर चर्चासत्रामध्ये सिताराम शिंदे, शाहीर शोभा मोरे, अनुसयाबाई पवार, जिजाबाई इंगळे,भारती अवचार, पंचफुलाबाई गवई, छाया पान पाटील, कासाबाई काळवाघे, सिंधुताई आहेर,मंगलाताई पवार आदींनी सहभाग घेत समयोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन रामभाऊ व्यवहारे यांनी केले. प्रास्ताविक आशाताई गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन संजय येंडोले यांनी व्यक्त केले.

____

सामाजिक चळवळींचा सहभाग.

 

यशस्वीतेसाठी बुलढाणा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, मराठा पाटील युवक समिती,रमाई ब्रिगेड, किसान ब्रिगेड,मातृतीर्थ रणरागिनी संघटना, वारकरी धर्म परिषद,ग्राम स्वराज्य समिती, छत्रपती स्वराज्य, राष्ट्रीय बजरंग दल, आझाद हिंद महिला संघटना आझाद हिंद शेतकरी संघटना नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती आधी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजन नियोजनाच्या यशस्वीतेसाठी सहभाग घेत बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली.

__

 

बुलढाणा :

दिनांक :12/03/2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *