08 जनावरांची सुटका….!!!!
मौदा पोलिसांची कारवाही…..!!!!
नागपुर:- दि.12 मार्च 2026 रोजी मौदा पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, भंडारा ते नागपुर मार्गे अवैध रित्या गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी माथणी शिवारात भंडारा ते नागपूर रोडवर नाकाबंदी केली असता त्यादरम्यान महिंद्रा बोलेरो क्रमांक एम एच 40 सि टी 9727 हे वाहन मिळून आले, सदर वाहन चालकास थांबवण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने पोलिसाचे वाहन पाहून गाडी थांबवून वाहनांमधून उडी घेऊन पळून गेला, पोलिसांनी पंचा समक्ष वाहनाचे तपासण्या केल्या असता त्यामध्ये एकूण 08 गोवंश जनावरे मिळून आले. जनावरांना कोणतीही चारा पाण्याची सोय न करता अत्यंत कमी जागे त दाटेवाटीने कोंबून व सिंगाला पायाला आकुड दोरखंडाने बांधून वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पंचा समक्ष घटनास्थळावरून महेंद्र बोलेरो क्रमांक एम एच 40 सीटी 97 27 किंमत सहा लाख रुपये, आणि आठ गोवंश जनावरे किंमत 80 हजार रुपये असा एकूण सहा लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपी विरुद्ध कलम 11(1) (ड)(ई)(एफ) प्राण्यांना निर्दयतेने वाहतूक प्रतिबंधक अधिनियम सहकलम 5(अ)(1))( 9) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल मौदा पोलीस स्टेशन येथे करण्यात आला.ही कारवाही मौदा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. सारीन दुर्गे यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी यांची आहेत.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
