दारव्हा/मस्तवाल सहाय्यक A P I दाभाडे विरुद्ध कठोर कारवाई करा उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे एसडीपीओ मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
Ct india News यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव
दारव्हा – कारंजा राष्ट्रीय महामार्गावरील भुलाई टोल प्लाझा बंद करण्यासाठी सुरु असलेल्या महाविकास आघाडीच्या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराशी जाणिवपूर्वक असभ्य वर्तन करून धक्काबुक्की करणाऱ्या मस्तवाल एपीआय पंकज दाभाडे यांचे विरुद्ध कठोर कारवाई करावी,अशा आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवित उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे .
दि 23 मार्च रोजी काँग्रेस सह महाविकास आघाडीतर्फे दारव्हा – कारंजा राष्ट्रीय महामार्गावरील भुलाई टोल प्लाझा बंद करावा यासाठी काँग्रेस सह महाविकास आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी दैनिक लोकसूत्रचे कार्यकारी संपादक केशव सवळकर हे तेथे पोहचले असता त्यांनी आपले ओळखपत्र दाखवून आंदोलन स्थळी जात असताना तेथे कर्तव्यावर तैनात असलेले एपीआय पंकज दाभाडे यांनी त्यांना जाणीवपूर्वक धक्काबुक्की करीत अपमानास्पद वागणूक दिली व एका प्रतिष्ठीत पत्रकारासोबत असभ्यवर्तन केले .या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्यामार्फत निवेदन सुपूर्द करून मस्तवाल एपीआय पंकज दाभाडे यांचे विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे .उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देताना दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष साहेबराव धात्रक,सचिव लक्ष्मीकांत नंदनवार,प्रसिद्धीप्रमुख निळकंठ धोबे,कार्याध्यक्ष प्रशांत भागवत,उपाध्यक्ष अरुण बेले,कोषाध्यक्ष अजय कानडे ,सदस्य सर्वश्री वसंतराव देशमुख ,गजानन भारती ,शैलेश ताजवे,अरविंद ओझलवार ,अविनाश मुन्नरवार, अजहरउल्ला खान ,डॉ . विशाल माने ,व्यंकटेश पेन्शनवार,संतोष कलाने , ताहेर मिर्झा ,भीमराव नगारे ,अंकुश पानपट्टे,सलमान अशहर खान,संजय देशमुख ,शिवचरण हिंगमिरे ,रवी भोयर आदि पत्रकार उपस्थित होते .
