गोंदिया पोलिसांचा धडाका! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; घरात लपवलेला

💥 गोंदिया पोलिसांचा धडाका! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; घरात लपवलेला ५ लाखांचा गांजा जप्त, महिला आरोपी गजाआड!

 

गोंदिया -: गोंदिया जिल्ह्यात अवैध धंदे आणि अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध पोलिसांनी अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या अंमली पदार्थ तस्कराचा पर्दाफाश केला असून, तब्बल ५ लाख ८६ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.🕵️ गुप्त बातमीदाराचे जाळे आणि एलसीबीचा अचूक सापळाजिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कडक निर्देश दिले होते. या निर्देशांनुसार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखालील पथक डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते.त्याच वेळी, सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा (सौंदड) येथील एक महिला आपल्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणावर गांजा लपवून ठेवून त्याची विक्री करत असल्याची अत्यंत गोपनीय व खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.

🚨 पोलिसांना माहिती मिळताच वेळ न दवडता, स्थानिक गुन्हे शाखेच्या बहादूर पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फुटाळा येथील संशयित महिला अनिता अशोक मोहनकर (वय ५३ वर्षे) हिच्या घरावर अचानक छापा टाकला. पंचांसमक्ष घराची झाडाझडती घेतली असता, घरातील मधल्या खोलीत एका कोपऱ्यात प्लास्टिकच्या गोणीत खाकी रंगाच्या टेपने गुंडाळलेले बंडल आढळून आले. प्लास्टिक पाकिटात सीलबंद असलेला तब्बल ५.८६६ किलो वजनाचा ओलासर हिरवा गांजा (पाने, फुले, शेंडे आणि बोंडे मिश्रित) पोलिसांना सापडला.पोलिसांनी एकुण ५,८६,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला , महिला आरोपीविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.👏 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ‘या’ टीमने गाजवली कामगिरी अंमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या अचूक मार्गदर्शनामुळे ही सणसणीत कारवाई यशस्वी झाली.या धाडसी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे, सपोनि अभिषेक जंगमवार, पो.हवा. तुलसीदास लुटे, पो.हवा. प्रकाश गायधने, पोहवा दुर्गेश तिवारी, पोशि सुनिल ढाकणे, पोशि राकेश डुंढरेकर आणि चापोशि विलास ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाची व कौतुकास्पद भूमिका बजावली.

गोंदिया जिल्हा उपसंपादक

अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *