खासदार डॉ. रामरावजी वडकुते साहेब यांना ‘कनोज विद्यापीठा’ची डॉक्टरेट पदवी;

खासदार डॉ. रामरावजी वडकुते साहेब यांना ‘कनोज विद्यापीठा’ची डॉक्टरेट पदवी; वसमत जवळा बाजार येथ येथे भव्य सत्कार सोहळा संपन्नकनोज विद्यापीठातर्फे खासदार मा. डॉ. रामरावजी वडकुते साहेब यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या राष्ट्रीय पातळीवरील बहुमानाबद्दल आणि सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद व प्रमुख उपस्थिती

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मा. मुरलीधर आप्पा मुळे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मुजीबजी पटेल साहेब यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात डॉ. वडकुते साहेब यांच्या आजवरच्या सामाजिक व राजकीय प्रवासाचा गौरवपूर्ण आढावा घेतला.

या सत्कार सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची व राजकीय नेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने:

डॉ. रमेश नवले (माजी शिक्षण सभापती)

मच्छिंद्रआप्पा दहाने (माजी सदस्य)

संतोष मुंजाळ (पेरजाबाद, धनगर समाज नेते)

संभाजी पाटील चव्हाण

संतोष शेळके (शिवसेना)

हाजी सलीम भाई कुरेशी

जावेद राज

अन्वर इनामदार (नगरसेवक, औंढा ना.)

या मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.

भव्य नागरी सत्कार

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या सत्कार सोहळ्यात सत्कारमूर्ती खा. डॉ. रामरावजी वडकुते साहेब यांचा मा. मुजीबजी पटेल साहेब व उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व पुष्पहार देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

हा विशेष सत्कार सोहळा माजी सदस्य तसेच फैसल भैय्या पटेल व मित्र मंडळाच्या वतीने अत्यंत नियोजित व उत्साही वातावरणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी डॉ. वडकुते साहेब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

 

छाया नागेश चव्हाण वसमत 🙏🏻👇🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *