मंगळवार दिनांक- १४/०७/ २०२६
स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया ची धडाकेबाज कामगीरी
बुलेट चोरी करणाऱ्या अन्तरराज्यीय टोळी चा स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाने केला पर्दाफाश –
आरोपीतांकडून चोरीची ३ बुलेट व ४ इतर मोटारसायकल एकूण किमती ५,०५०००/- रुपये चा मुद्देमाल हस्तगत
दिनांक १०/०७/२०२६ रोजी फिर्यादी नामे मनोज दामोदर कटकवर राहणार दासगाव जिल्हा गोंदिया यांनी पोलीस स्टेशन रावणवाडी येथे तक्रार दिली की दिनांक ०९/०७/२०२६ रोजी रात्री दरम्यान त्यांचे घराचे अंगणात ठेवलेली रॉयल इन्फिल्ड कंपनीची काळ्या रंगाची बुलेट कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने पोलीस स्टेशन रावणवाडी येथे अपराध क्रमांक 359/26 कलम 303 (2 ) भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल करण्यात आले होते तसेच दिनांक १०/०७/२०२६ रोजी फिर्यादी नामे जयेंद्र भोजराज नागपुरे राहणार बरबसपुरा यांनी पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथे तक्रार दिली की दिनांक ०९/०७/२०२६ रोजी च्या रात्री दरम्यान त्यांचे घराचे पोर्च मध्ये ठेवलेली बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची पिवळा तपकिरी रंगाची कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याने पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथे अपराध क्रमांक ३९२/२६ कलम 303 (2 ) भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल करण्यात आले होते
सदर गुन्ह्यांचा गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे सर यांचे निर्देशाप्रमाणे व पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे ,स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात दिनांक १३/०७/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पोलीस पथक अज्ञात आरोपीतांचा तसेच जिल्हा हद्दीत अउघड मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपी शोध व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलीग करीत असतांनी गुप्त बातमीदारांकडुन तसेच तांत्रीक विष्लेषणवरुन माहीती प्राप्त झाली की, ग्राम भेंडारा व शिवणघाट , बालाघाट येथील राहणारे 1) रोहीत नरेन्द्र माने वय 21 वर्ष रा. भेंडारा ता. खैरलांजी जि. बालाघाट म.प्र. 2) निखील सुंदरलाल राहांगडाले वय 20 वर्ष रा. शिवनघाट ता. खैरलांजी जि. बालाघाट म.प्र. 3) वरुण जागेश खुळसाम वय 21 वर्ष रा. फुटारा ता. खैरलांजी जि. बालाघाट म.प्र. 4) विधीसंघर्षीत बालक रा. शिवनघाट ता. खैरलांजी जि. बालाघाट म.प्र. यांनी आपले मित्रासोबत मिळुन गोंदिया जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत मोटार सायकल चोरी केलेल्या आहेत. या खबरेवरुन स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया पथकाने सापळा रचुन इसम नामे निखील सुंदरलाल राहांगडाले वय 20 वर्ष रा. शिवनघाट ता. खैरलांजी जि. बालाघाट म.प्र. यास ताब्यात घेवुन विचारपुस केले असता त्याने ग्राम दासगाव, बरबसपुरा, भोसा (आमगाव), बोरगाव (कवलेवाडा ) , एकोडी या ठिकाणावरुन तसेच इतर दोन वेगवेळया ठिकाणावरुन दोन होन्डा शाईन मोटार सायकल असे एकूण ७ मोटर सायकल रोहीत नरेन्द्र माने, वरुण जागेश खुळसाम , नयन भानुप्रसाद ठाकरे वय 19 वर्ष रा. बल्लारपुर ता. लालबर्रा जि. बालाघाट व विधीसंघर्षीत बालक यांचे सोबत मिळुन चोरी केले असल्याचे सांगीतले. त्यानंतर रोहीत नरेन्द्र माने व विधीसंघर्षीत बालक यांचा शोध घेतला असता ते ग्राम डोंगरमाली येथे मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन ग्राम बल्लारपुर ता. लालबर्रा जि. बालाघाट म.प्र येथे जावुन नयन भानुप्रसाद ठाकरे यास ताब्यात घेऊन विचारपुस करण्यात आली असता त्याने सांगीतले की त्याने निखील सुंदरलाल राहांगडाले वय 20 वर्ष रा. शिवनघाट ता. खैरलांजी जि. बालाघाट म.प्र. व वरुण जागेश खुळसाम वय 21 वर्ष रा. फुटारा ता. खैरलांजी जि. बालाघाट म.प्र. व रोहीत नरेन्द्र माने रा. भेंडारा म.प्र. व विधीसंघर्षीत बालक रा. शिवणघाट म.प्र. याचे कडुन एकुण 07 मोटार सायकल खरेदी केली असुन त्यापैकी चार मोटार सायकल त्याचे घरी मिळून आले व 03 मोटार सायकल ग्राम भटेरा ता. जि. बालाघाट मध्यप्रदेश येथे ठेवले असल्याचे सांगितले . नयन भानुप्रसाद ठाकरे राहणार लालबर्रा बालाघाट याचे ताब्यातून गोंदिया जिल्ह्यात वेगवेगळे पोलीस स्टेशन मध्ये चोरीची एकुण 7 मोटार सायकल मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत.
आरोपीतांकडुन खालीलप्रमाणे मोटार सायकल जप्त करण्यात आले
1) 70,000/- रू. एक रायल एनफिल्ड कंपनीची बुलेट पिवळा तपकीरी रंगाची
2) 1,20,000/- रू. एक रायल एनफिल्ड कंपनीची बुलेट काळया रंगाची
3) 70,000/- एक रायल एनफिल्ड क्लासीक कंपनीची बुलेट काळया रंगाची लाल पट्टे
असलेली
4) 40,000/- रू. एक होन्डा शाईन कंपनीची काळया रंगाची लाल रंगाचे पट्टे असलेली
5) 30,000/- रू. एक हिरो कंपनीची काळया रंगाची स्पैलेंडर प्लस मोटार सायकल
6) 90,000/- रू. एक होन्डा कंपनीची शाईन काळया रंगाची लाल पट्टे असलेली
7) 85,000/- रू. एक होन्डा कंपनीची शाईन काळया रंगाची लाल पट्टे असलेली
अशा प्रकारे एकुण किंमती 5,05,000/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी नामे 1) रोहीत नरेन्द्र माने वय 21 वर्ष रा. भेंडारा ता. खैरलांजी जि. बालाघाट म.प्र. 2) निखील सुंदरलाल राहांगडाले वय 20 वर्ष रा. शिवनघाट ता. खैरलांजी जि. बालाघाट म.प्र. 3) नयन भानुप्रसाद ठाकरे वय 19 वर्ष रा. बल्लारपुर ता. लालबर्रा जि. बालाघाट (म.प्र) यांना ताब्यात घेवुन पुढील कायदेशिर कार्यवाही करिता मुद्देमाल सह पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथे स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. अभय डोंगरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री रेवचंद सिंगनजुडे यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. अभिषेक जंगमवार, स.पो.नि. अमरदीप खाडे , पो.हवा. संजय चौहान ,पो.हवा.दिक्षीतकुमार दमाहे, पो.हवा. सुबोधकुमार बिसेन, पो.हवा.इंद्रजित बिसेन, पो.हवा. सोमेन्द्रसिंह तुरकर, पो.हवा. रियाज शेख , पो. हवा. भोजराज बहेकार, पो.हवा. राजकुमार खोटेले , पो.हवा. सुजित हलमारे, पो.शि.छगन विठ्ठले,पो.शि. चापोशि. राम खंदारे, चापोशि विलेश ठाकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी केली आहे.
गोरेगांव तालुका प्रतिनिधी महादेव शेन्डे
