कामठी पोरवाल कॉलेज माजी विध्यार्थी चा हीरक जयंती ‘एलुमनी मैत्री मिलन’ संपन्न

कामठी पोरवाल कॉलेज माजी विध्यार्थी चा हीरक जयंती ‘एलुमनी मैत्री मिलन’ संपन्न

——————————————-

बिमल घोष व विजय शर्मा यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये मैगज़ीन चे विमोचन,

माजी विद्यार्थी ‘एचीवमेंट अवार्ड’ ने सम्मानित

——————————————-

 

कामठी

कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज चे माजी विध्यार्थी च्या वतीने हीरक जयंती निमित्त एक भव्य ‘एलुमनी मैत्री मिलन’ समारोह चे आयोजन ११ जुलै २०२६ कलमना रोड येथील साबले सेलिब्रेशन लॉन येथे करण्यात आले होते.

हा कार्यक्रम विशेष रूप ‘डॉक्टर्स डे’ ला समर्पित होता. त्याचा मुख्य उद्देश्य कॉलेज चे माजी विद्यार्थी यांना सम्मानित करने होते. जे आज चिकित्सा व अन्य क्षेत्रात आपली उत्कृष्ट सेवा देत आहे.जुन्या आठवणीना उजाळा देत एक विशेष ‘एलुमनी मैत्री मिलन’ मैगज़ीन चे विमोचन करण्यात आले. जे कार्यक्रमाचे आकर्षण केंद्र बनले.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथि द्रोणाचार्य अवॉर्डी व नेशनल फुटबॉलर बिमल घोष, एपीएमसी मुंबई चे उपसभापति हुकुमचंद आमधरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश मोटे,नंदी क्लिनिक चे संचालक व बंगाली वेलफेयर एंड कल्चरल एसोसिएशन चे उपाध्यक्ष डॉ. बी.एन. नंदी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. निशात शेख, प्रेरणा स्रोत व पोरवाल कॉलेज चे सचिव विजय शर्मा, सीईओ डॉ. सुधाकर धौंगडे, प्राचार्य डॉ. स्वप्निल डहात यांनी आपली उपस्थिती दर्शविली. तसेच त्यांच्या सह उद्योगपति सुनील अग्रवाल, उद्योगपति नागोराव साबले, शिवसेना जिल्हा संघटक राधेश्याम हटवार व समाज सेवी आशा गोवर्धनदास आनंद मंचावर उपस्थित होते .

सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ मैगज़ीन व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या गौरवशाली सत्कारात चिकित्सा क्षेत्रात जूडलेले डॉ. अनिल मंगतानी, डॉ. महेश महाजन, डॉ. प्रवीण नितनवरे यांना त्यांच्या दिलेल्या सेवेबद्दल सम्मानित करण्यात आले. त्याच बरोबर कैंटोनमेंट बोर्ड चे माजी उपाध्यक्ष महेंद्र भूटानी, माजी उपाध्यक्ष दिनेश स्वामी, पीएसआई अजय गर्जे, घोरपड़ च्या सरपंच तारा बलवंत कडु व कन्हान नगर पंचायत चे उपाध्यक्ष रिंकेश चौरे यांना मंचावर सन्मानित केले.

या आयोजन मध्ये फक्त अनुभवी नाहीतर कॉलेज च्या वर्तमान विद्यार्थ्यांना ‘एचीवमेंट अवार्ड’ ने सन्मानित करण्यात आले.ज्यांनी शैक्षणिक व अन्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली.तसेच संस्थेचे नाव रोशन केले आहे. त्याचबरोबर सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज चे एलुमनी असोसिएशन उपाध्यक्ष डॉ.प्रा. इफ्तेखार हुसैन, उपप्राचार्य विश्वनाथ वंजारी, हेमंत शर्मा, नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अहफ़ाज़ अहमद, आर.के.एस. पब्लिक स्कूल चे संस्थापक राजकुमार खियानी, समाजसेवी रामकिशन खंडेलवाल, उद्योगपति प्रवीण मांडे, माजी एक्साइज अधिकारी अब्दुल गफ्फार, रब्बानी स्कूल चे माजी प्राचार्य डॉ. नसीम अख़्तर, माजी सभापति श्रावण केळझळकर नगरसेवक योगेश गायधने, नगरसेवक नितेश यादव, सफाई कर्मचारी यूनियन अध्यक्ष दिनेश बिल्लरवान, खैरी ग्राम पंचायत चे माजी सरपंच बंडू कापसे, बिल्डर राजेंद्र यादव, गुरुनानक बॉडी वर्क्स संचालक गुरुदेशसिंग चाना, संपादक पत्रकार परिषद चे उपाध्यक्ष अजय त्रिवेदी, सचिव एम.ए.जब्बार, तेजस बहुउद्देशीय संस्था चे चंद्रशेखर अरगुलेवार, जामियातुल कुरैश संगठन कार्याध्यक्ष इर्शाद कुरैशी, महेश गिरी, एयरटेल बैंक चे चंद्रशेखर चकोले, विदर्भ एजुकेशन फोरम चे अध्यक्ष अनवारूल हक पटेल व वाहतूक पुलिस निरीक्षक मनीष बंसोड यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ज्यात परितोष मुखर्जी, अभिजीत बैनर्जी, पूर्णिमा बैनर्जी, प्रवीण बनकर व अलका लाड़े सह डॉ.अनिल मंगतानी, आशा आनंद, प्रदीप ठाकरे, जायद अली पटेल सह अन्य कलाकारांनी सदाबहार फिल्मी गाणे प्रस्तुत करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.

या हीरक जयंती च्या ऐतिहासिक व भव्य आयोजन च्या यशस्वितेसाठी पोरवाल कॉलेज चे माजी विद्यार्थी कन्वेनर सौमित्र कल्याणी बैकुंठनाथ नंदी (उपसंपादक), चेयरमैन माया चवरे, डेप्युटी चेयरमैन नरेश दावानी, डेप्युटी चेयरमैन उदयसिंग यादव, डेप्युटी कन्वेनर रितेश यादव व परितोष मुखर्जी यांची भूमिका महत्वपूर्ण होती. यांच्या सह कोर कमेटी चे सक्रिय सदस्य सुधीर शंभरकर, प्रमोद वर्णम, प्रदीप (बाल्या) सपाटे, मनोज रंगारी, रविन्द्र तांडेकर, राजबहोर मिश्रा, दीपक निकोसे, बंडू नारनवरे, सुनील चलपे, दिलीप मेश्राम, नंदु कोल्हे,प्रदीप ठाकरे, मनोज मेश्राम, शीतल बरबटे, सुनीता पोतनवार, नम्रता अढाउ, शहनाज़ अली, कोमल लेंढारे, बॉबी महेंद्र, उमेश शामकुंवर, दिनेश शेंडे, उदय नागदेवे, शहज़ाद पटेल, विनोद गजभिए व मनोज डांगे यांनी अथक परिश्रम घेतले.

कामठी तालुका प्रतिनिधी – दिलीप मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *