शहरात व शासकीय कार्यालयांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी 


शहरात व शासकीय कार्यालयांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

 

सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे

 

 

सोयगाव दि.०१– शहरासह शासकीय कार्यालयांमध्ये दि.०१ ऑगस्ट शनिवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तर तहसील कार्यालयात पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार काकासाहेब साळवे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. रामजीनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन सुनील साळवे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तर क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा येथील कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांच्याहस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान शहरासह, शासकीय कार्यालयांमध्ये ठिकठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे सुनील वानखेडे,वसंत कारके, पाटील, तहसील कार्यालयाचे महेंद्र पवार,राहुल जयवळ, शिवाजी शेरे,तडवी, क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे,संचालक उर्मिला इंगळे,रुपाली लोखंडे, पद्माबाई शिंदे, मीनाबाई गाडेकर, शारदा इंगळे,अनिल लोखंडे, ज्ञानेश्वर गाडेकर,अशोक ढगे,लोक शाहीर विष्णू मापारी,संजय आगे,संजय चोधरी,अनिल साळवे, सुनील शिंदे ,विमल बाई खैरनार ,संतोष दणके,भीमराव दणके,नारायण खैरनार ,शांताराम दणके ,आकाश रावळकर ,आकाश बोरसे ,शुभम मगरे,काशिनाथ दळवी,एकनाथ गोंड ,तुकाराम रावळकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *