विनोबा ॲप मधील उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान*

*विनोबा ॲप मधील उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान*

 

जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात बुलढाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील जिल्हास्तरावर राबविल्या जाणारे जीवन कौशल्य उपक्रमामध्ये उत्कृष्ट कार्य करत असलेले शिक्षक श्री. अबील फरमान शेख अय्युब (जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा सुलतानपूर) तालुका लोणार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सदरील पुरस्कार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा श्री. गुलाबराव खरात साहेब व मा. प्रकल्प अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा श्री. पी. एस. कोल्हे साहेब आणि मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा, श्री विकास पाटील साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला श्री. अकील शेख साहेब व श्री. अनिल देवकर साहेब उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा तथा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम चे कार्यक्रम समन्वय श्री. मोहन सुरडकर वरिष्ठ जिल्हा समन्वयक श्री. शेख नजीर उपस्थित होते.

 

सर्व मान्यवरांनी अबील फरमान सर यांना शुभेच्छा दिल्या व जिह्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणा द्यावी अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

*प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *