बालविवाह लावून दिलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांकडून सुटका; सात आरोपींविरुद्ध गुन्हा, आठ जणांना अटक*

*बालविवाह लावून दिलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांकडून सुटका; सात आरोपींविरुद्ध गुन्हा, आठ जणांना अटक*

 

केळवद पोलिसांच्या तत्परतेमुळे बालविवाह लावून दिलेल्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली असून या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि सहायक पोलीस अधीक्षक सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली केळवद पोलिसांनी तत्परता व संवेदनशीलता दाखवत ही कारवाई केली.

पीडित मुलीच्या आईचे एका वकिलाशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रियकराने पीडितेला व तिच्या आईला नागपूर येथे बोलावून एका महिलेची भेट घडवून दिली. त्यानंतर आई, तिचा प्रियकर आणि साथीदारांनी संगनमत करून अल्पवयीन मुलीचा मध्यप्रदेशातील एका व्यक्तीशी विवाह लावून दिला आणि तिला मध्यप्रदेशात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

१७ जुलै रोजी मौजा रामपुरी फाटा येथे मुलीने प्रसंगावधान राखत वाहन थांबवण्याचा बहाणा केला. वाहन थांबताच आईशी वाद झाला, त्यावेळी जवळच असलेल्या केळवद पोलिसांनी हस्तक्षेप करत मुलीकडून संपूर्ण हकीकत जाणून घेतली आणि तिची तात्काळ सुरक्षित सुटका केली.

या प्रकरणी कलम १४३, ३(५) भा.न्या.सं. सह बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३, ९, १० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींमध्ये राजेश गणपत बच्छांगी (४३, अचाना, धार, मध्यप्रदेश), रवी रामप्रसाद यादव (२५, अचाना, धार), रामप्रसाद नंदराम यादव (५३, अचाना, धार), संजय रतन परमार (५०, कुवर्षी, धार) आणि दुल्हेसिंग गजबसिंग कच्छवा (४३, गुणावत, धार) यांचा समावेश आहे. याशिवाय पीडितेची आई व आणखी एका महिलेला अटक करण्यात आली असून, आरोपी क्रमांक ८ म्हणून नागपूरचे वकील नाझीर शेख यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास केळवद पोलीस करत आहेत.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *