जरंडी गावा बाहेरील पुलावर ट्रॅक्टर दुचाकीचा अपघात एक जण जखमी, सुदैवाने जीवित हानी टळली—
सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव दि.१६– सोयगाव तालुक्यातील जरंडी गावाबाहेरच्या रस्त्यावर असलेल्या नदी पुलावर सोमवारी सायंकाळी सहा साडेसहा वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी चा समोरासमोर अपघात होऊन एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून सुदैवाने जीवित हानी टळली असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. जखमीला जरंडी येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री साडेसात वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले. मयूर अलीम तडवी वय २८ वर्ष रा. निंबायती असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजित पाटील परिचारिका ज्योती आचारे यांनी जखमेवर उपचार केले चेहऱ्यावर पाच टाके पडले असून उपचारानंतर जखमी युवकास रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पाटील यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात एम एल सी (वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण / अहवाल ) केली आहे. रात्री उशिरापर्यंत जळगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली नव्हती.दरम्यान मयूर अलीम तडवी हा मित्रासह दुचाकीवर सोयगाव कडून निंबायती गावाकडे जात होता. तर बहुलखेड्याकडून फरदापुर कडे येत असलेले स्वराज ७४४ एफ इ (ट्रॅक्टर व ट्रॅक्टर ट्रॉलीवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आलेली नोंदणीकृत नंबर नाही) या ट्रॅक्टर चालकांनी फुलावर करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर अचानकपणे वाहन चढवल्याने दुचाकी स्वारास काही कळण्या अगोदरच ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडकून अपघात झाला यामध्ये मयूर अलीम तडवी हा जखमी झाला होता. या अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. सोयगाव तालुक्यात ट्रॅक्टर वर चालक म्हणून काम करीत असलेल्या चालकांजवळ प्रादेशिक परिवहन विभागा चा ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
