सत्रापूर – कन्हान येथील महाकाली मंदिरात विविध धार्मिक उत्सव
महिला भाविकांनी रांगोळी काढून केली मंदिराची सजावट
कन्हान
जय महाकाली सेवा समिती सत्रापुर कन्हान च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कन्हान नदीच्या काठावर वसलेले ऐतिहासिक ब्रिटिशकालीन प्राचिन महाकाली मंदीर सत्रापुर (कन्हान) येथे चैत्र नवरात्रौत्सव निमित्त विविध धार्मिक उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन सकाळ व सायंकाळ पुजा , महाआरती भजन, जस गीत गायन करण्यात येते. येथील महिला भाविकांनी रांगोळी काढून मंदिराची सजावट केली आहे.
या एतिहासिक ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाची साक्ष देणारे आणि बंगालच्या कारागिरांना साक्षात दर्शन देणा-या सत्रापुर येथील जय महाकाली मंदिर हे एक प्राचिन अत्यंत जागृत देवस्थान आहे. दि.३१ मार्च ला सकाळी ९ वाजता कन्हान नदीच्या पावन पात्रात घटविसर्जन करण्यात येईल.त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येईल. आई महाकालीच्या प्रत्यक्ष साक्षात्काराने पुण्य झालेल्या या पावन भूमीत नतमस्तक होऊन आई महाकालीच्या दर्शनाचा लाभ घेऊन आपले जीवन कृतार्थ करण्याचे आवाहन जय महाकाली सेवा समिती, सत्रापुर (कन्हान) च्या वतीने करण्यात आले आहे.
कन्हान शहर प्रतिनिधी
मनिषा मेश्राम
