रोडवरील रोही आडवी आल्याने मोटरसायकलचा अपघात (अपघातात एका जणांचा मृत्यू)*

*रोडवरील रोही आडवी आल्याने मोटरसायकलचा अपघात (अपघातात एका जणांचा मृत्यू)*

 

प्रतिनिधी मनोज टाक जिंतूर

 

जिंतूर तालुक्यातील बोरी- कौसडी मार्गांवरील नागठाण पाटी जवळ सोमवारी 13 जुलै रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकी समोर अचानक रोही (वन्य प्राणी )आल्याने भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले बबन सखाराम भुमरे (55)वर्ष रा कानड ता सेलू त्यांना परभणी येते उपचारा साठी हलविण्यात आले होते व उपचार सुरु असतांना दुपारी सुमारे 12:30वाजण्याच्या सुमारे त्यांचे निधन झाले. मिळालेल्या माहिती नुसार बबन भुमरे हे सोमवारी बोरी येथील आठवडी बाजारासाठी बोरी येथे येत होते.रुग्णवाहीकेचे चालक अतिन शेख यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमी बबन भुमरे यांना ग्रामीण रुग्णालय बोरी येते दाखल केले.तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केला.डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय परभणी येथे जाण्यास सांगितले.या अपघाताची बातमी बोरी पोलीस स्टेशन ला देण्यात आली असून घटनेची नोंद घेण्याची प्रकिऱ्या सुरु आहे. दरम्यान कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हला कीची असल्याने शासनाने भुमरे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *