बिना संगम व भानेगावच्या पुनर्वसनासाठी निवेदन
जिल्हाधिकारी डॉ. कुमार यांना दिले निवेदन
कामठी :
बिना संगम व भानेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेती विलीनीकरणासह गावांच्या प्रलंबित पुनर्वसनाच्या मुद्द्यावर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. शिष्टमंडळाने शेती विलीनीकरणामुळे निर्माण झालेल्या अडचणी, जमिनीच्या हक्कांसंबंधीच्या बाबी आणि प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न वेकोलिच्या ब्लास्टिंगने घरांना तडे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच वेकोलिच्या खाणकाम व ब्लास्टिंगमुळे बिना संगम येथील घरांना व शाळेच्या इमारतीला तडे गेल्याची बाब सांगत, परिस्थितीच्या पाहणीसाठी गावाचा दौरा करण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना पुढील १५ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी भिवा तांडेकर, राजेश खांडेकर, शंकर केळवदे, आकाश चंद्रमणी भिमटे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कामठी तालुका प्रतिनिधी – दिलीप मेश्राम
